* पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नांना यश
* एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचा होणार विकास
* प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांना संरक्षण
दिपक देशमुख
नवी मुंबई : पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी गेली अनेक वर्षे केलेल्या प्रयत्नांना आणि अविरत पाठपुराव्याला अखेर यश आले असून नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक झाली आहे. गणेशोत्सवामध्ये शहरवासीयांना हे शुभर्वतमान मिळाले आहे. पालकमंत्री ना. नाईक यांच्या पुढाकाराने मंगळवारी (दि.२) सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींचा पुनर्विकास अडीच एफएसआयच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास मुंबईच्या धर्तीवर एसआरएच्या माध्यमातून होणार असून प्रकल्पग्रस्तांनी गावठाण क्षेत्रात गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर कारवाई न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीस आ. संदीप नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान, नगरविकास क्रं. १ चे सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृहनिर्माण विभागाचे सचिव श्री. चक्रवर्ती, नगरविकास विभाग क्र. २ चे सचिव श्रीकांत सिंह, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव अशिष सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
सिडकोने विविध उत्पन्नगटांसाठी नवी मुंबईत बांधलेल्या इमारती निकृष्ट दर्जाच्या असल्याने कमी कालावधीतच त्या धोकादायक बनल्या. या इमारतींमधून घरांचे छत कोसळून अनेक रहिवासी जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास होण्यासाठी पालकमंत्री ना. गणेश नाईक हे मंत्रालयीन स्तरावर तसेच आ. संदीप नाईक हे विधानसभेत अविरत पाठपुरावा करीत होते. ना. गणेश नाईक यांनी २००७ सालापासून तत्कालीन तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांसमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या. या बैठकांमधून सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत अडीच एफएसआयच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुनर्विकास योजनेवर नवी मुंबई महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. तसेच या धोकादायक इमारतींमधील
७० टक्के रहिवासी ठरवतील त्या विकासकाच्या माध्यमातून या इमारतींची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे या इमारतींमधून राहणार्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार असून त्यांच्या डोक्यावर असलेली अपघातांची टांगती तलवार दूर होणार आहे.
नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी भाग असून या झोपडपट्ट्यांमधून राहणार्या लाखो रहिवाशांचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच इमारतीमध्ये त्यांना हक्काचे मोफत घर मिळावे यासाठी ना. गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आज झालेल्या बैठकीत मुंबईच्या धर्तीवर एसआरएच्या माध्यमातून नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्ट्यांमधील ७० टक्के रहिवाशी ठरवतील त्या विकासकांच्या माध्यमातून एसआरए योजना राबविण्यात येणार असून यामुळे या सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांना मोफत घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी मुंबईच्या निर्मितीसाठी येथील स्थानिकांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने सिडकोला विकल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सिडकोने
वेळेत केले नाही. साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रक्रिया देखील वेळेत पूर्ण केली नाही. काळाच्या ओघात प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली. त्यामुळे त्यांनी राहण्यासाठी गरजेपोटी घरे बांधली. तसेच उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक बांधकामे केली. यामध्ये या घटकांचा काहीच दोष नव्हता. त्यामुळे ही बांधकामे नियमित करावीत या मागणीसाठी ना. गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी प्रयत्न केले. याबाबत शासन जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत या बांधकामांवर कारवाई करू नये, अशी मागणी केली होती. ही मागणी देखील आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केली असून त्यामुळे या बांधकामांना संरक्षण मिळाले आहे.
नवी मुंबईतील वरील अतिमहत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री ना. गणेश नाईक हे २००७ पासून मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करीत होते. तसेच आ. संदीप नाईक हे विधानसभेत प्रयत्न करीत होते. आ. संदीप नाईक यांनी लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा, विशेष चर्चा, इत्यादी संसदीय आयुधांचा वापर करून विधानसभेमध्ये जोरदार आवाज उठविला होता. या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्व घटकांचा सिडकोवर महामोर्चा देखील नेला होता. या भगीरथ प्रयत्नंाना यश आले आहे. आ. संदीप नाईक यांनी या निर्णयाबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांचे आभार व्यक्त केले आहेत.
* प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपर्यंत केलेला पाठपुरावा…
१) पालकमंत्री नामदार श्री. गणेशजी नाईक यांच्या पुढाकाराने दिनांक २७ जून २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत नामदार विलासराव देशमुख यांच्यासमवेत सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत पहिली बैठकझाली होती. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री नामदार श्री. अशोक चव्हाण यांच्यासमवेत दिनांक २१ ऑगस्ट २००९ रोजी या प्रश्नी बैठक झाली. विद्यमान मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत दिनांक २३ सप्टेंबर २०११ आणि दिनांक २१ नोव्हेंबर २०११
या दोन दिवशी या प्रश्नी बैठका झाल्या. या सर्व बैठकांमधून सकारात्मक चर्चा झाली होती.
२) दिनांक १८.०६.२०१३ रोजी मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना या मागण्यांबाबत पत्र देण्यात आले होते.
३) नवी मुंबईतील धोकादायक इमारतींमधून राहणार्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या रिक्त असलेल्या इमारतींमध्ये करण्याची मागणी करण्यात आली होती.
४) ठाणे जिल्हयातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीविषयी दिनांक १०.०७.२०१३ रोजी मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत चर्चा झाली होती.
५) २० सप्टेंबर २०१३ रोजी मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषीमंत्री नामदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली होती.
अडीच एफएसआयच्या माध्यमातून सिडकोच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्याची आग्रही मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली होती.
५) २० सप्टेंबर २०१३ रोजी मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषीमंत्री नामदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत सहयाद्री अथितीगृह येथे बैठक झाली होती. अडीच एफएसआयच्या माध्यमातून सिडकोच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
* आमदार म्हणून केलेला पाठपुरावा
१) तत्कालीन मुख्यमंत्री नामदार अशोक चव्हाण यांना २०.७.२०१० रोजी पत्र.
२) तत्कालीन मुख्यमंत्री नामदार अशोक चव्हाण यांना २०.१०.२०१० रोजी पत्र.
३) विद्यमान मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांना ३.२.२०११ रोजी पत्र.
४) मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांना २१.११.२०११ रोजी पत्र.
५) तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री नामदार भास्कर जाधव यांना ३.२.२०११ रोजी पत्र.
६) मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांना ७.९.२०१२ रोजी पत्र.
७) उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांना १३.१.२०१२ रोजी पत्र.
८) सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना २८.११.२०११ रोजी पत्र.
९) २६ मे २०१४ रोजी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना लेखी निवेदन.
* नवी मुंबईकरांच्या जिव्हाळयांच्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी २००७ सालापासून मंत्रालयीन स्तरावर अविरत पाठपूरावा करीत होतो. या प्रयत्नांना यश आल्याचा आंनद आहे. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीचा पुर्नविकास होणार असून या इमारतीमधून राहणार्या लाखो रहिवाश्यांना चांगल्या प्रकारचे आणि सुरक्षित घर मिळणार आहे. एसआरएच्या माध्यमातून झोपडपटयांचा विकास होणार असल्याने सर्व सामान्य झोपडपटीवासीयांना मोफत घर मिळणार असून त्यांचे जिवनमान उंचावणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्तानी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांना संरक्षण मिळणार आहे.
– पालकमंत्री नामदार गणेश नाईक
* नवी मुंबईकरांच्या जिव्हाळयांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली आहे. याचे मला समाधान आहे. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीमधून स्लॅब कोसळून रहिवाशी जखमी होत होते. त्यांच्या डोक्यावरची ही अपघाताची टागती तलवार आता दूर होणार आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करता आला याचे समाधान आहे. हा विषय राजकारणापलिकडचा होता जनतेच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा असा होता. खर्या अर्थाने नवी मुंबईकरांसाठी स्वप्नपूर्ती आहे. पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांचे आम्ही नवी मुंबईकर जनतेच्या वतीने आभार मानतो.
– आमदार संदीप नाईक