जनतेकडून आ.संदीप नाईकांचे उत्स्फूर्त स्वागत
सुजित शिंदे
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी बुधवारी सकाळी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या आमदार निधीतून साकारलेल्या ऐरोली सेक्टर १५ येथील जॉगिंग टॅ्रकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना भेटून केला.
संदीप नाईक यांनी उमेद्वारी अर्ज भरल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. आमदार म्हणून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. पर्यावरण संवर्धनाचा आणि जनजागृतीचा वसा हाती घेतलेल्या संदीप नाईक यांनी वृक्षारोपण मोहीम राबवून शहराच्या हिरवाईत भर घातली आहे.खाडीकिनारी मोठया प्रमाणावर खारफुटींचे रोपण केले आहे. ऐरोलीतील सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवा वर्ग यांना आरोग्यदायी अशा पहिल्या इकोफ्रेंडली जॉगिंग ट्रॅकची निर्मिती ऐरोली सेक्टर १५ परिसरात केली. आमदार संदीप नाईक यांच्या विशेष निधीतून या ट्रॅकची निर्मिती झाली आहे.
आपण निर्माण केलेल्या जॉगिंग ट्रॅकमुळे नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी, विरंगुळयासाठी आणि शुध्द तसेच मोकळा श्वास घेण्यासाठी ठिकाणाची उपलब्धता झाल्याबद्दल आमदार नाईक यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
ऐरोली सेक्टर १५ ते दिवा गाव सर्कलपयर्र्ंतच्या सुमारे २ किलोमीटर जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात संदीप नाईक यांनी सकाळी भेट दिली. त्यांचे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सर्व नागरिकांनी जोशात स्वागत केले आणि पुन्हा निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक संघटना ‘योग संघटने’चे साधक त्याचबरोबर अनेक महिला बचत गटाच्या भगिनींनी संदीप नाईक यांना शुभेच्छा दिल्या. संदीप नाईक यांनी देखील सर्वांशी दिलखुलासपणे संवाद साधत ज्येष्ठ नागरिक आणि अबालवृध्दांचे कृपाशिर्वाद घेतले. नागरिकानी केलेल्या सहकार्यामुळे आणि नामदार गणेश नाईक यांच्या दृरदृष्टी विकासाच्या व्हिजनमुळे ऐरेाली मतदारसंघाचा समतोल आणि सर्वांगसुंदर विकास साधण्यात यश आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ऐरोलीतील जॉगिंग ट्रॅक पुढे कळव्यापर्यंत विस्तारित करण्याचा मनोदय याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला.
या प्रचार दौर्याप्रसंगी संदीप नाईक यांच्यासोबत नगरसेवक अशोक पाटील, जिल्हा सदस्य जी.एस.पाटील, नगरसेवक तात्या तेली, चंदू पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.