सुजित शिंदे
नवी मुंबई : मतदार संघात विकास कामे केलेले आणि जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा उमेदवार हेच पुन्हा विजयश्री प्राप्त करतील, असा विश्वास व्यक्त करीत वाशीतील नागरिकांनी संदीप नाईक यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
आज (ता.२) गुरुवारी सकाळी संदीप नाईक यांनी वाशी सेक्टर २९ येथील स्व.राजीव गांधी उद्यानातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. संदीप नाईक यांनी ज्येष्ठ नागरिक आणि इतरा नागरिकांसोबत मॉर्निंग वॉकदरम्यान हितगुज साधले.
ज्येष्ठ नागरिकांनी संदीप नाईक यांचे आदरपुर्वक स्वागत करुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार म्हणून संदीप नाईक यांनी चांगली कामे केली आहेत आणि जे चांगली कामे करतात, त्यांनाच मतदार विजयी करतात, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. राजीव गांधी उद्यानानंतर संदीप नाईक यांनी वाशी येथील मीनी सीशोर येथील ज्येष्ठ आणि इतर नागरिकांना भेट दिली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी ओपन जीम आणि निवारा शेडची (गजेबो) मागणी त्यांच्याकडे केली.
आमदार निधीतून संदीप नाईक यांनी ऐरोली सेक्टर १५ येथे पहिला इकोफ्रेंडली जॉगिंग ट्रॅक साकारला आहे. त्याच धर्तीवर येथेही जॉगिंग ट्रॅक उभारला जाईल, अशी ग्वाही दिली. मॉर्निंग वॉकदरम्यान संदीप नाईक यांच्यासमवेत नगरसेवक(प्रभाग-४५) प्रभाकर भोईर, समाजसेवक शशिकांत राऊत, नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीचे रामनाथ भोईर, समाजसेवक प्रल्हाद भोईर आदी उपस्थित होते.
काल बुधवारी (ता.१) नवी मुंबईत अचानक आलेल्या सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाने नागरिकांची दैना उडवली. आज शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. तर शहरातील काही घरांचे नुकसानही झाले. कार्यतत्पर संदीप नाईक यांनी त्वरीत ग्रीन होप सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांना मदत कार्य करण्याच्या सूचना केल्या. स्वतः संदीप नाईक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नौसील नाका, महापे हनुमान नगर, श्रमिक नगर, कोपरखैरणे प्रभाग क्रमांक ३४, प्रभाग क्रमांक २४, घणसोली प्रभाग क्रमांक २५ येथील पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. याप्रसंगी संदीप नाईक यांच्यासमवेत नगरसेवक प्रभाकर कांबळे, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, समाजसेवक लक्ष्मण पाटील, हरिष वाघमारे, रामचंद्र पाटील, वैजनाथ गोबारे, रविंद्र बागराव, प्रकाश सुरवडे आदी उपस्थित होते.