सुजित शिंदे
नवी मुंबई – गावच्या आणि नवी मुंबईतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भोर, वेल्हा, मुळशी रहिवाशी सेवा संघ आणि वाई, महाबळेश्वर, खंडाळा रहिवाशी संघाचे मेळावे येत्या ५ सप्टेंबर रोजी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये पार पडणार आहेत.
वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा रहिवाशी संघाचा मेळावा सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सदर मेळाव्यात शिवसेना नेते दिवाकर रावते हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. डी. एम. बावळेश्वर, मामासाहेब वडखरे, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले, बेलाूपर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन संपर्कप्रमुख अशोक मुंगसे, दर्शन भणगे, आत्माराम सणस, सुरेश सकपाळ, विजय बढे यांनी केले आहे.
भोर, वेल्हा, मुळशी रहिवाशी संघाचा मेळावा याच ठिकाणी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना उपनेत्या निलम गोर्हे, कुलदीप कोंडे, सत्यवान उभे, अमोल पांगारे, रविकांत धुमाळ आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन पारिजात पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ, सोपान कंक, संतोष चर्हाटे, सुरेश दिघे, दिनकर सणस, अशोक जाधव, विजय किंद्रे, विकास बांदल, अन्ना धोंडे, विजय रेणुसे, अंकुश खोपडे यांनी केले आहे.