अनुराग वैद्य
नवी मुंबई : बुधवारी सांयकाळी झालेल्या वादळी वार्याने व मुसळधार पाऊसाने नवी मुंबईकरांची त्रेधातिरपिट झाली असली तरी या पावसात नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना सांडपाण्याच्या दुर्गंधीयुक्त पाण्यात वाटचाल करावा लागल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर नेरूळ सेक्टर सहाच्या बकालपणा आणखी वाढीस लागतो. पावसाळा सुरू झाल्यावर प्लॉट १५ वरिल शिवम या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीलगतच्या अंतर्गत रस्त्यावर मल:निस्सारण वाहिनी सतत फुटतच असल्याने नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना सतत या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामोरा करावा लागत आहे.
बुधवारी सांयकाळी पाऊस सुरू झाल्यावर शिवम सोसायटीलगत एमएसईडीसीच्या डीपीलगतची आणखी एक रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिनी फुटली आणि शिवालिक सोसायटीच्या समोर दुर्गंधीचे पाणी साचले.
स्थानिक रहीवाशांनी तात्काळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी मनोज मेहेर यांना संपर्क केला. मनोज मेहेर व त्यांच्या सहकार्यांनी तुंबलेल्या सांडपाण्याला मार्ग काढून देताना तुंबलेले पाणी हटविण्याचा प्रयास केला. याचवेळी (सांयकाळी ७ वाजता) शिवालिक सोसायटीच्या तळमजल्यावर असणार्या कृष्णा मेडीकलमध्ये वरूणा सोसायटीतील दांपत्य औषधासाठी आले होते. मुलगी पाय निसरून त्या सांडपाण्यात पडली असता मनोज मेहेर यांनी त्या मुलीला उचलून घरपो सोडविले.
यावेळी उपस्थित स्थानिक रहीवाशांनी महापालिका प्रशासनावर आपला राग व्यक्त केला. मनोज मेहेरच्या पत्रांना केराची टोपली दाखविण्याच्या प्रकारानेच समस्या सुटत नसून समस्या सोडविण्याच्या कामात राजकारण केले जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला. मनोज मेहेरच्या कामाची आपणास कल्पना असून त्याच्यासोबत आपण असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
मल:निस्सारण वाहिन्याची सातत्याने दुरूस्ती करण्यासाठी व चोकअप काढण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी आपण प्रशासनाला व इतरांना निवेदनेही दिली होती. पण समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासन जाणत नसल्याने व इतरांना मनोज मेहेरच्या पत्रांचे राजकारणच करायचे असल्याने नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी यावेळी केला.
शिवम सोसायटीतील इंजिनिअरींगचे शिक्षण घेणार्या एका युवकाला काही दिवसापूर्वी डेंग्यू झाला असल्याचे सांगतानाच मनोज मेहेर यांनी अजून किती जणाच्या आरोग्याशी प्रशासनाला व इतरांना खेळायचे आहे, असा संतप्त सवाल मनोज मेहेर यांनी व्यक्त केला आहे.