* दिघा परिसरात नागरिकांचा प्रचंड पाठिंबा
नवी मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराच्या तुलनेत नवी मुंबई शहर विकासाच्या दृष्टीने अग्रेसर आहे. इतर शहरात पाणीपट्टी आणि पालिकेचे इतर कर नेहमी वाढतात. मात्र लोकनेते गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीमुळे आज नवी मुंबईकरांवर कराचा बोजा लादला जात नसून नवी मुंबईला प्रगतीपथावर नेण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ऐरोली मतदार संघातील युवा उमेदवार संदीप नाईक यांनी व्यक्त केले.
युवा उमेदवार श्री. संदीप नाईक यांची प्रचारफेरी आज (गुरुवार) दिघा ईश्वरनगर, सद्गुरुनगर, बालीनगर मार्गे रामनगर, साठेनगर, आंबेडकरनगर, दिघा गाव, बिंदुमाधवनगर, विष्णुनगर अशी काढण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक भोलानाथ ठाकूर, समाजसेवक अनंत ठाकूर, नगरसेवक अक्षय ठाकूर, नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका अपर्णा
गवते, कुणाल ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
श्री. नाईक यांनी ऐरोली मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे. त्याच्या प्रचार फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळत आहे.
सन २००९ साली जनतेने श्री. नाईक यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखविला आहे. नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आवर्जून पुढाकार घेऊन विधानसभा आणि पालिकेच्या माध्यमातून सर्वच प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांची उच्च विचारसरणी आणि दूरदृष्टीकोन लक्षात घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्यासाठी संधी मिळाली असून निवडणूक प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे. या प्रचार दौर्यात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून आपले मत हे विकास कामे करणार्याला असून गुंडगिरी व दहशतवाद माजविणार्या उमेदवाराला नाही, असे नागरिक ठामपणे सांगत आहेत.
युवा उमेदवार श्री. नाईक प्रचार फेरीप्रसंगी बोलताना म्हणाले की, लोकनेते गणेश नाईक यांचा दूरदृष्टीकोन आणि जनतेची मिळालेली साथ यामुळे शहराचा समतोल विकास साधण्यात यश आले आहे. नवी मुंबई शहरात आज अनेक जातीधर्माचे लोक आनंदाने राहतात. परंतु या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही घटक करीत आहेत. नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करून खोटी ओशासने व अनेक प्रलोभने देत आहेत. परंतु नवी मुंबईची जनता ही कोणत्याच आमिषांना बळी न पडता आपल्यालाच मतदान करेल.