ऐरोली / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई ऐरोली विधानसभा मतदार संघाचे
अधिकृत उमेदार श्री. गजानन शामराव खबाले यांच्या दिघा परिसरात बुधवारी पार पडलेल्या प्रचार फेरीला स्थानिक नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रचार अभियानात नागरिक विशेषत: युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर स्वत:हून सहभागी झालेला पहावयास मिळाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई ऐरोली विधानसभा मतदार संघाचे
अधिकृत उमेदार श्री. गजानन शामराव खबाले यांच्या दिघा येथील प्रचार फेरी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विभाग अध्यक्ष राजू यादव, विनोद कडू, धनंजय भोसले, उपविभाग अध्यक्ष जयवन गायकवाड, रुपेश कदम, महिला उपशहर अध्यक्षा सौ. शुभांगी बंदिचोडे, सौ. प्रिय गोळे, शहर सचिव सौ. गायत्री शिंदे, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष महादेव काकडे, उपशहर अध्यक्ष प्रिन्स सिंग, शहर सचिव प्रेम दुबे, दिघा शाखा अध्यक्ष मोहन माने, सोपान जाधव, विनोद पोखरकर, शंकर काटेकर, राम जाधव तसेच आदर्श मित्र मंडळ व शिव समर्थ महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांचा उस्फुर्त पाठींबा यावेळी लाभला.
** मनसे विननार विकासाचे जाळे, आता येणार गजानन खबाले **
महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आणि नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी
एकच सक्षम पर्याय आपला माणूस साधा माणूस श्री. गजानन शामराव खबाले आता इतिहास नाही, विकास घडवायचाय तो हि तुमच्या साथीने, तुमच्या आशीर्वादाने आघाडी सरकार लुटून गेली, विकास आराखडा घेऊन माणसे आली गुन्हेगारी प्रवृत्तीला, घराणेशाहीला खिळ ठोकणार आश्वासनांची बरसात नाही तर विकास काम करून दाखवणार आशा घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे आजूबाजूचा परिसर दणाणून गेला.