नगरसेवेवक विक्रम शिंदे यांचा पलटवार
नवी मुंबई : जय महाराष्ट्र चॅनलच्या टॉक शो मध्ये बेलापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार गजानन काळे यांचा तोल जावून त्यांनी अरेरावीची भाषा केल्याने राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला, आम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नाही, असा खुलासा राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नगरसेवक विक्रम शिंदे यांनी केला आहे.
वाशी येथील आंबेडकर भवनमध्ये जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलचा टॉक शो आज ठेवण्यात आला होता. या शोमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या वतीने भूमिका मांडण्यासाठी महापौर सागर नाईक सहभागी झाले होते. परंतू , महापौर विकासकामांवर बोलत असताना काळे हे त्यांच्यात सातत्याने अडथळा निर्माण करीत होते. कोणत्याही प्रकारचे पुरावे न देता भ्रष्टाचाराचे आरोप करणारे काळे यांच्यावर महापौर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यावर काळे खवळले. मुद्यावरुन ते गुद्यावर आले. त्यांनी महापौर नाईक यांना ऐकरी संबोधल्याचे नगरसेवक शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कोणताही प्रकारचा हल्ला टॉक शो दरम्यान केलेला नाही. त्यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. ज्या उमेदवाराला शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा सन्मान ठेवता येत नाही तो उमेदवार
जनतेचा मान काय ठेवणार? अशी टिका विक्रम शिंदे यांनी काळे यांच्यावर केली आहे.