ऐरोली / वार्ताहर
मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गजानन खबाले यांच्या प्रचारासाठी दिघा ते रबाले या ठिकाणी नवनिर्माण रॅलीचे आयोजन केले होते. सदर रॅलीला स्थानिक नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकार्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. ही रॅली स्थानिक रहिवाशी, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी स्थानिक रहिवाशी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच महिला मिळून २००० ते २५०० च्या संख्येने उपस्थित राहिले.
यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी ठिकठिकाणी चौकाचौकात फटाके वाजून आपल्या लाडक्या उमेद्व्राचे स्वागत केले. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या प्रचार फेरीमुळे विरोधी पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. गजानन खबाले यांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता ऐरोली मतदार संघात गजानन खबाले आज दुसर्या स्थानी असल्याचे मतदारांकडूनच उघडपणे सांगण्यात येत आहे.
सामान्य जनतेचा, स्थानिक रहिवाशांचा, सर्वच जाती धर्माच्या आणि पश्चिम
महाराष्ट्रातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात गजानन खबाले यांना पाठींबा मिळत आहे. सदर प्रचार फेरीत पक्षाचे नवी मुंबई उपशहर निलेश बाणखेले, शहर सचिव दत्तात्रय सूर्यवंशी, वाहतूक सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुप्रीत सिंग मिनहस, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष अनिल धात्रक, वाहतूक सेना विभाग अध्यक्ष बजरंग धायगुडे, अरुण पवार, उपविभाग अध्यक्ष अजय मोरे, भानुदास विधाते, तांत्रिक सल्लागार कुंदन सूर्यवंशी, चित्रपट सेना उपसचिव राजेंद्र शेट्टी, जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, महिला सेना उपशहर अध्यक्षा प्रिया गोळे, उपशहरअध्यक्षा शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव
गायत्री शिंदे, जनहितकक्ष ऐरोली महिला विभाग संघटक अनघा देशमुख, मृणाल महाडिक, विभाग अध्यक्षा यशोदा शिंदे, शुभांगी यादव, सोनल बुटकी, कृष्णन्न्नअय्यर, जनहित कक्ष विभाग अध्यक्षा अंधा देशमुख, विभाग अध्यक्षा (जनहित कक्ष) , उपविभाग अध्यक्षा सुवर्णा भोसले, भारती पाटील, शाखा अध्यक्षा ज्योती सैद, मेधा फदाले, ज्योती खाडे, उपशाखा अध्यक्षा सुषमा गायकवाड, जनहित कक्ष ऐरोली विधानसभा अध्यक्ष शेखर मढवी, विभाग अध्यक्ष अनिल ससाणे, विनोद कडू, धनंजय भोसले, राजू यादव, अनिल राठोड, प्रवीण साळुंके, भगवान मसुरकर, उपविभाग अध्यक्ष रुपेश कदम, रितेश खुडे, महादेव थोरवे, अविनाश ठाकूर, विजय जोंधळे, शाखा अध्यक्ष विवेक सिंग, सुनील भोसले, प्रवीण घोगरे, कय्याम शेख, जनहित कक्ष कोपरखैरणे विभाग संघटक समीर जाधव, समाजसेवक शंकर काटेकर, विनोद पोखरकर, सुभाष पाटील, संभाजी खबाले यांच्यासह असंख्य स्थानिक रहिवाशांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर प्रचार फेरीची सांगता झाली.