सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई उपशहर अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गजानन खबाले यांची भव्य दिव्य अशी प्रचार फेरी शनिवारी सकाळी पावना या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी स्थानिक रहिवाशी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच महिला मिळून १०० ते ११२५च्या संख्येने उपस्थित राहिले.
यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी ठिकठिकाणी चौकाचौकात फटाके वाजून आपल्या लाडक्या उमेदवाराचे स्वागत केले. सदर पद प्रचार रॅलीला सामान्य जनतेचा, स्थानिक रहिवाशांचा, सर्वच जाती धर्माच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात गजानन खबाले यांना पाठींबा मिळत आहे. पुरणार आणि उरणार, ऐरोली विधानसभा मतदार संघात फक्त मनसेचाच झेंडा फडकणार, सदर प्रचार फेरीत पक्षाचे नवी मुंबई उपशहर निलेश बाणखेले, महिला सेना उपशहर अध्यक्षा प्रिया गोळे, उपशहर अध्यक्षा शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव गायत्री शिंदे, जनहित कक्ष ऐरोली महिला विभाग संघटक, विभाग अध्यक्ष निल ससाणे, विनोद कडू, नंजय भोसले, राजू यादव, भगवान मसुरकर, उपविभाग अध्यक्ष विजय जोंधळे, शाखा अध्यक्ष नामदेव कांबळे, उपशाखा अध्यक्ष अक्षय सोनकांबळे, जयेश कांबळे, गट अध्यक्ष पवन पवन सरोदे, लक्ष्मण देवकर, शाखा अध्यक्ष अमित आढाव, समाजसेवक शंकर काटेकर, विनोद पोखरकर, सुभाष पाटील, संभाजी खबाले यांच्यासह असंख्य स्थानिक रहिवाशांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर प्रचार फेरीची सांगता झाली.