मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बेलापुर मतदारसंघात गणेश नाईकांसारख्या दिग्गजांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंचा सीबीडी-बेलापुर येथे रविवार, ३० नोव्हेंबर रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सीबीडी बेलापुर सेक्टर २० येथील विद्या प्रसारक हायस्कूलच्या पटांगणावर या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बेलापुर, दिवाळे, शहाबाज, फणसपाडा, आग्रोळी येथील ग्रामस्थांकडून तसेच सीबीडी बेलापुरमधील नागरीकांकडून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडून आल्यावर सत्कार सोहळ्याच्या आयोजनाला फाटा देत आमदार मंदाताई म्हात्रेंनी लोकांशी संपर्क व महापालिका मुख्यालय, एपीएमसी आदी ठिकाणी भेटी दिल्याने मतदारांच्या मंदाताईंकडून अपेक्षा उंचावल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाताईंना मतदारसंघाच्या विकासाकरीता प्रोत्साहीत करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.