नवी मुंबई : घणसोली ते ताड़देव मुंबई अशी एन एम् एम टी बस सेवा सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आली आहे . बस क्र १२१ या बसचे शुभारंभ ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. ही घणसोली ते ताड़देव मुंबई यादरम्यान प्रवासी वाहतूक करणार असून त्यामध्ये सिद्धिविनायक प्रभादेवी महालक्ष्मी दादर असे भाग आहेत. यावेळी परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कमल पाटील, घणसोलीचे नगरसेवक संजय पाटील, नगरसेविका मोनिका पाटील, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती मोहन म्हात्रे यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.