अनंतकुमार गवई
नवी मुंबई : बँकिंग व्यवसायात निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या संधी पाहता नवी मुंबईतील सुशिक्षितांसाठी शिवसेनेने ३ डिसेंबर रोजी सानपाड्यात मोफत सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
३ डिसेंबर रोजी सानपाडा सेक्टर ७ मधील आश्रय हॉलमध्ये सांयकाळी ६ ते ९ या वेळेत हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे. स्वरराज प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र करिअर अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती निघाल्याने या भरतीप्रक्रियेत नवी मुंबईतील सुशिक्षित युवा कोठेही कमी पडू नये म्हणून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती स्वरराज प्रतिष्ठानचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गणेश पावगे यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमीचे जिल्हा संयोजक किशोर शेवाळे आणि शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघठक तसेच स्वरराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या पावगे यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. स्वप्नील मुंज या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे.
बेरोजगारी हटविण्यासाठी शिवसेनेने आयोजित केलेल्या या शिबिरात नवी मुंबईतील सुशिक्षितांनी सहभागी होवून माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन किशोर शेवाळे, गणेश पावगे व विद्या पावगे यांनी संयुक्तपणे केले आहे.