अनंतकुमार गवई
नवी मुंबई : बेलापूर विभाग कार्यालयांतर्गत असणार्या आग्रोळी गावातील दास ऑफशोर ते शिवानी अपार्टमेंट व शिवानी अपार्टमेंट ते पारसिक जनता सहकारी बँक दरम्यान असणार्या मुख्य मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नगरसेविका व नवी मुंबई मनपाच्या विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पंधरा वर्षापूर्वी या मलनिःसारण वाहिन्यांचे काम करण्यात आले होते. त्यावेळी, आग्रोळी गावाची लोकसंख्या कमी होती. सध्यास्थितीत गावातील लोकसंख्या कालावधीनुसार वाढल्याने या मल:निस्सारण वाहिन्या दुरुस्तीचे काम गरजेचे होते त्यानुसार हे काम करण्यात येत असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले. मलनिःसारण दुरुस्तीचे काम ए.के. इलेक्ट्रिकल्स-वर्क्स या कंपनीमार्फत तीन महिन्यात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती कंत्राटदार अशोक केदासे यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील, समाजसेवक निळकंठ पाटील, शाखाप्रमुख सोमनाथ म्हात्रे, युवासेना शाखाधिकारी मनोज डोंगरे, शाखासंघटक गीता पाटील, साधना कातकरी, उपशाखा संघटक श्वेता पवार, जेष्ठ नागरिक अरुण कागले, तिवारी, भगवान म्हात्रे, दशरथ कांबोटकर, शिवसैनिक बेबीताई पाटील, जयश्री कातकरी, स्वाती पिंगळे, नरेश म्हात्रे, महेश कामोठकर, हृदयनाथ कातकरी, विजय कातकरी, नवनाथ कातकरी, बाबू कातकर इत्यादी मान्यवर व आग्रोळीचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.