नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये सोमवारी कांदा १० रूपये तर बटाटा २० रूपये किलो या दराने विकला गेला असल्याची माहिती मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
सोमवारी कांदा बटाटा मार्केटमध्ये १२५ ट्रक कांदा, ७० ट्रक बटाटा तर ५ ट्रक लसनाची आवक झाली असून कांदा १० ते १५-१६ रूपये किलो दराने तर बटाटा २० ते २४ रूपये किलो दराने विकला गेला असल्याचे संचालक वाळूंज यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पुणे, सोलापुर,फलटण भागातून कांदा एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीकरीता येत असून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातून अधिकांश बटाटा विक्रीला येत आहे. सध्या महाराष्ट्रातील तळेगाव भागातून बटाटा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असल्याचे संचालक अशोक वाळूंज यांनी सांगितले.