अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महागाईच्या काळाता सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम खर्या अर्थांने सहकार बाजारसारख्या सहकारातील सेवाभावी संस्थांनी केले आहे. मानवी अन्न वस्र निवारा ची गरज असताना अन्न स्वस्त सहकारातुन उपलब्ध होते आहे . सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याची म्हणून गणल्या जाणार्या अपना बाजारच्या शाखा नवी मुंबईच्या कानाकोपर्यात उघडल्या जाव्यात अशी अपेक्षा या उद्घाटनवेळी ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यानी व्यक्त केली.
या वेळी व्यासपीठावर ठाणे उपजिल्हा निबंधक दिलीप उढाण, अध्यक्ष विजय गव्हान ,दशरथ पाटील, पाणी पुरवठा सभापती नवीन गवते , एम. के. मढवी, अपर्णा गवते, संजय पाटील, रामदास भोईर , सुनील जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संदीप नाईक यावेळी पुढे म्हणाले, अंत्यत उपयोगी चळवळीपासून सकारात्मक विचार चांगले विचार लोकांपर्यत पोहोचविणारी ही संस्था आहे , आपण कॉलेज जीवनात असताना स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांच्या पासून प्रेरणा भेटली आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात सहकार वाढला असला तरी कोकण पट्ट्यात सहकार आज राहिला नसल्याची खंत आमदारांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.