अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलाचे ए. सी. पी. अरविंद साळवे आणि डी. सी. पी. दिनकर ठाकूर यांच्या मार्गदर्शन खाली नवी मुंबई पोलिस वाहतूक नियंत्रण विभागातर्फे०५ डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
नेरूळ विभागातील शिवाजी चौक ते नेरूळ बस डेपो या ठिकाणी सेंट झेविअर्स हायस्कुल आणि जुनिअर कॉलेज च्या १०० विद्यार्थीनी सहभाग घेतला होत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग तुर्भेचे पोलिस निरीक्षक डेरे, हेड कॉन्स्टेबल डी. पी. भामरे, यु . डी. तरकसे, पोलिस नाईक के. सी. धनगर, किरण नवरे, शाळेच्या प्राचार्य मनिषा आंधनसरे , शिक्षक आर.एस.पी. अधिकारी यशवंत पाटील, मनोज चव्हाण, विलास चव्हाण, संतोष बोडके, संजय रायचुरकर, नवी मुंबई महानगरपालिका बी विभागाचे पाटील या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला होता. वाहतूक विभाग तुर्भे यांच्या वतीने तोंडाला बांधायचे मास्क, नाश्ता व पाण्याची सुविधा पुरविली होती.