अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई कॉंग्रेसचे जेश्ठ नेते व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य अनिल कौशिक यांचा ५२ वा वाढदिवसानिमित्त वाशी सेक्टर १७ येथील माधवराव सिंधिया चैक येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त अरूण वालतुरे, यांच्या हस्ते, तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबु थॉमस व जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जनरल फिजिषीयन, ऑर्थोपेडीक, कान, नाक, घसा, डोळे तपासणी, २ डी इको, इ.सी.जी. तपासणी, रक्तदाब तपासणी, बालरोग, इत्यादी व्याधीं व आजारांवर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल संकुलाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व औशधांचे वाटप यावेळी करण्यात आले. यामध्ये ५३८ नागरिकांनी सहभागी होवून या शिबिराचा लाभ घेतला. अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात खर्या अर्थाने आनंद झाल्याचे या शिबीराचे आयोजिका श्रीमती सुदर्शना कौशिक यांनी व्यक्त केले.
या शिबिरास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव व नवी मुंबई प्रभारी छायाताई आजगांवकर यांच्यासह निशांत भगत, अविनाश लाड, माजी नगरसेविका संगीता सुतार, विजय वाळुंज, महेश भणगे, अरूण राजगुरू, दिगंबर राऊत, सचिन षिंदे, बंटी सिंग, सपना लांबा, चंद्रकला नायडु, पुजा जैन, रामेश्वर दयाल शर्मा, बाळकृष्ण बैले, योगेश ठोसर, षार्दुल कौषिक, आदि कॉंग्रेस पक्षातील व अन्य पक्षातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन अनिल कौशिक यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. सदरचे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. गौरव कौशिक यांचे विषेश सहकार्य लाभले.