मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : नेरूळच्या विकसिकरणात आध्यात्माचे फार मोठे योगदान राहीले असून त्याच परंपरेचा वारसा पुढे चालविताना आई वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ गावच्या गांवदेवी मंदीरात राज्यस्तरीय भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
३ व ४ जानेवारी असे दोन दिवस ही राज्यस्तरीय भजन महोत्सव स्पर्धा भरविण्यात येणार असून २० भजनी मंडळांना या स्पर्धेत प्रवेश घेता येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस व माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भजन महोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
२५ हजार रूपये रोख -स्मृतीचिन्ह – मानपत्र असे प्रथम पारितोषिक असून १५ हजार रूपये रोख -स्मृतीचिन्ह – मानपत्र हे द्वितीय पारितोषिक तर तृतीत पारितोषिक विजेत्यास १० हजार रूपये रोख -स्मृतीचिन्ह – मानपत्र दिले जाणार असल्याचे आयोजक नामदेव भगत यांनी सांगितले. उत्तेजनार्थ पारितोषिके तीन दिली जाणार असून यात ३ हजार रूपये रोख -स्मृतीचिन्ह – मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे. स्पर्धेतील सहभागी सर्व भजनी मंडळांना प्रमाणपत्रे व मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ठ तबला वादक, उत्कृष्ठ पखवाज वादक, उत्कृष्ठ गायक यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून नेरूळ पंचक्रोशीतील भाविकांना भजनाचा आस्वाद घेता यावा हा आपला उद्देश असून ही स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.