अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शिवसेनेच्या वतीने रविवार, दि. ४ जानेवारी रोजी सीबीडी, सेक्टर १५ येथे महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदेसह ठाण्याचे खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, शिवसेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख विठ्ठल मोेरे उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी १० वाजल्यापासुन सांयकाळी ४ वाजेपर्यत हा कार्यक्रम सीबीडी सेक्टर १५ येथील सीएनजी पेट्रोलपंपाच्या बाजूला प्लॉट १ ए येथे हे शिबिर होत असून शिवसेनेने युवा शक्ति मित्र मंडळ, सुश्रुषा हॉस्पिटल, साई समर्थ हॉस्पिटल, अष्टविनायक हॉस्पिटल, पामबीच हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल व कामोठे डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. ह्द्यविकारतज्ज्ञ डॉ. संजय तारलेकर, डॉ. अमरदीप गरूड, डॉ. मंगेश नाईक, डॉ. रूपेश वडगावकर, डॉ. भूषण मोरे, डॉ. लक्ष्मण भोईटे आदी मार्गदर्शन करणार असून मोफत गोळ्या-औषधे व टूथपेस्टचेही शिबिरार्थींना मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणार्यांनी आधारकॉर्ड, राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचे कॉर्ड, पिवळे-केसरी रेशनकॉर्ड यापैकी काहीही एक आणावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचेही आयोजन केले आहे. युवा सेना जिल्हाप्रमुख अभिमन्यू कोळी, नगरसेविका राधा ठाकूर, ज्येष्ठ शिवसैनिक रामादादा कोळी, उपशहरप्रमुख विशाल कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत पाटील आदी या कार्यक्रमांचे निमत्रंक असून दिवाळे गावचे शाखाप्रमुख चंद्रकांत पाटलि, बेलापुर गावचे शाखाप्रमुख संदीप पाटील, प्रकाश आमटे, भूषण मोरे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.