सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई लाइव्ह. कॉम ही मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी २०१४ रोजी नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली नवी मुंबईतील पहिली वेबमिडीया. सर्वसामान्यांच्या कार्याची दखल घेता घेता नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी परिश्रम करणार्या नगरसेवकांना महापालिका प्रशासनाने गेल्या पाच महिन्यापासून मानधन दिले नसल्याचे वृत्त सर्वप्रथम नवी मुंबई लाइव्ह.कॉम या वेबमिडीयामध्ये प्रकाशित झाले अन् नवी मुंबईकरांत खळबळ उडाली. सोशल मिडीयावर हा विषय प्रभावीपणे चर्चिला गेला. नवी मुंबई लाइव्ह.कॉमच्या बातमीचा दणका बसताच निद्रीस्त पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि २ जानेवारीला नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या बँक खात्यात चार महिन्याचे मानधन जमा झाले. महापालिकेतील नगरसेवकांच्या थकीत मानधनावर प्रकाशझोत टाकल्याबद्दल पालिकेतील सर्वाधिक नगरसेवकांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी भ्रमणध्वणीवरून नवी मुंबई लाइव्ह.कॉम या वेबमिडीयाचे आभार मानले आहेत.