अनंतकुमार गवई
नवी मुंबई : पत्रकारदिनानिमित्त ६ जानेवारी रोजी निवडणूका: प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टस् या पत्रकार संघटनांकडून पत्रकारदिनानिमित्त या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून वाशीतील तुंगा रिजेन्सी, ऍबोंनी हॉल, सेंटर वन मॉलजवळ सकाळी ११ वाजता या परिसंवादाला सुरूवात होणार आहे. या परिसंवादामध्ये आय.बी.एन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, दै. सकाळचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, दै. दोपहर का सामनाचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्ला हे प्रमुख वक्ते सहभागी होणार आहेत.
या परिसंवादामध्ये नवी मुंबईतील पत्रकारांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टस्चे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी संयुक्तपणे केले आहे.