अनंतकुमार गवई
नवी मुंबई :नेरूळ सेक्टर ८ परिसरात शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या कार्याच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेला ‘नगरसेवक चषक’ विशाल इलेव्हनने पटकावला. अंतिम सामन्यात विशाल इलेव्हनने हेमंत इलेव्हनचा पराभव करत नगरसेवक चषकावर आपले नाव कोरले.
नेरूळ सेक्टर ८ मधील यंगस्टार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या एम.जी.एम हायस्कूलच्या क्रिडांगणावरील नगरसेवक चषकात नवी मुंबईतील आठ क्रिकेट संघ सहभागी झाले होते. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, स्थानिक नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांच्या हस्ते नगरसेवक चषकाचा शुभारंभ झाला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार राजन विचारेंच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख मनोज इसवे, गणपत शेलार, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, विभागप्रमुख गणेश घाग, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, युवासेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विलास म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.