अनंतकुमार गवई
नवी मुंबई : ग्रामीण भागातील मुलांना दहावीच्या परिक्षेला सामोरे जाताना कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये, त्यांच्या शंकाचे निवारण व्हावे यासाठी नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी कार्यरत असलेल्या संकल्प सामाजिक स्वंयसेवी संस्थेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील भरणे या गावी दोन दिवसीय एस.एस.सी मोफत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
१० व ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ४.३० वाजेपर्यत ही व्याख्यानमाला भरणे गावातील श्री. कालकाई मातेच्या मंदीराशेजारील श्री. गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांच्या संकल्पनेतून पी.एस.जंगम, राजेंद्र तांबट, दिलीप सकपाळ यांच्या सहकार्यातून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेला खेड पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, खेड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट शिक्षणाधिकारी सौ. एम.बी.व्हावळ, नवी मुंबईतील सीए ए.एम.शेट्टी, नवी मुंबई महापालिका रूग्णालयातील डॉक्टर राजेश ओतूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक अशोक सकपाळ यांनी दिली.