अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शिवसेना नेरूळ पश्चिम विभागाच्या वतीने युवा जल्लोष-२०१५ अर्ंतगत भव्य कबड्डी व भव्य लंगड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्व. मॉंसाहेब मिनाताई ठाकरे चषक व हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे चषक देवून गौरविण्यात येणार आहे.
नेरूळ सेक्टर १२ मधील तेरणा विद्यालयाच्या मैदानावर शनिवार, दि. १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ६ वाजेपर्यत लंगड्डी स्पर्धा आणि रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ६ वाजेपर्यत कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवसेना विभाप्रमुख सुनिल हुंडारे, शिवसेना नगरसेवक सतीश रामाणे, शाखाप्रमुख संतोष चाळके, शिवसैनिक काशिनाथ पवार यांनी संयुक्तपणे या युवा जल्लोषचे आयोजन केले आहे.
या युवा जल्लोषअर्ंतगत होणार्या स्पर्धांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, शिवसेनेच्या जिल्हासंघठक सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, के.एन.म्हात्रे, शिवसेना संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, शहर संघठक सौ. रोहीणी भोईर, उपशहरप्रमुख गणपत शेलार, उपशहरसंघठक सौ. वसुधा सावंत, माजी विरोधी पक्षनेता दिलीप घोडेकर, नगरसेवक रतन मांडवे, ज्येष्ठ शिवसैनिक बबन पाटील उपस्थित राहणार आहे.
या युवा जल्लोषातील स्पर्धांना नवी मुंबईतील क्रिडाप्रेमी नागरिकांनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन आयोजक शिवसेना विभाप्रमुख सुनिल हुंडारे, शिवसेना नगरसेवक सतीश रामाणे, शाखाप्रमुख संतोष चाळके, शिवसैनिक काशिनाथ पवार यांनी संयुक्तपणे केले आहे.