अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शिवसेना महिला आघाडी नवी मुंबई, सानपाड्यातील सामाजिक संघटना स्वराज संघटना आणि मातोश्री वुमेन्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘जागर महिला शक्तिचा’- महिला महोत्सव २०१५ला नवी मुंबईतील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख के.एन.म्हात्रे व शिवसेनेच्या नवी मुंबई शहर महिला आघाडी संघठक सौ. रंजना शिंत्रे यांच्या हस्ते ‘जागर महिला शक्तिचा’- महिला महोत्सव २०१५ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे सानपाडा विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव, माजी नगरसेवक सोमनाथ ववासकर, ग्राहक संरक्षण कक्षप्रमुख घनशाम पाटे, बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीचे नवी मुंबई जिल्हा संयोजक किशोर शेवाले, शिवभक्त गणेश पावगे, शाखाप्रमुख सुनिल गव्हाणे उपस्थित होते.
या अभियानार्ंतगत ५ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत पौष्ठिक पराठे, पकोडे, सॅडविच, चायनीज पदार्थ शिकविणे हे पहिल्या तीन दिवसामध्ये महिलांना शिकविण्यात आले. उर्वरित चार दिवसामध्ये आकर्षक ज्वेलरी बनविणे, वारली पेन्टिंग, मेकअप साडी नेसण्याचे १५ प्रकार शिकविण्यात येणार आहेत.
सदर महोत्सवात सानपाडा विभागातील २७५ महिलांनी सहभाग घेतला आहे. १२ जानेवारीला जिजामाता जयंतीदिनी सदर प्रशिक्षण वर्गातील महिलांच्या स्पर्धा घेवून महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन शिवसेना महिला आघाडी विभाग सानपाडा विभागाच्या सौ. सावित्री चौघुले, महिला आघाडीच्या उपशहर संघठक व स्वरराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. विद्या पावगे (किर्दत), विभाग संघठक सौ. वैशाली बनकर, डॉ. आशालता गोंधळे, वैशाली भोर, रंजना कांडरकर, उपविभागसंघठक वंदना चौगुले, वंदना गोडसे, शाखासंघठक कांचनमाला वाफारे, संचिता जोईल, स्नेहल चव्हाण या रणरागिनींनी केले आहे.
तसेच संपूर्ण महोत्सवाची प्रशिक्षण जबाबदारी नवी मुंबईतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रणी असलेले स्वरराज प्रतिष्ठान पार पाडत आहे. हे प्रशिक्षण प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना महिला आघाडी व स्वरराजच्या वतीने राबविण्याचा मानस आहे.