अनंतकुमार गवई
नवी मुंबई : श्री.गणेश जयंती सोहळ्यानिमित्त नेरूळ सेक्टर २८ मधील श्री. गणेश सहकारी गृहनिर्माण संस्थेत शनिवार, दि. १७ जानेवारी ते शुक्रवार, दि. २३ जानेवारीदरम्यान कैवल्याचा पुतळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प गणेश महाराज (ओझर गणपती) हे कैवल्याचा पुतळा यातून ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आध्यात्मिक ज्ञानयज्ञ सोहळा सादर करणार आहेत.
नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता कलशपुजाने या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. कैवल्याचा पुतळा या कार्यक्रमांतर्गत पहाटे ४ ते ६ काकडआरती, सांयकाळी ५ ते ६.३० हरिपाठ, सांयकाळी ६.३० ते ७ श्रींची आरती, सांयकाळी ७ ते रात्रौ १० ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्रावर आध्यात्मिक ज्ञानयज्ञ सोहळा असे धार्मिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
सांयकाळी ७ ते रात्रौ १० ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्रावर आध्यात्मिक ज्ञानयज्ञ सोहळा यामध्ये १७ जानेवारी रोजी ज्ञानेश्वरी एकनाथांकडून समाजाकडे, १८ जानेवारी रोजी ज्ञानदेव पुर्वज इतिहास, १९ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर महाराज जन्म, २० जानेवारी रोजी विठ्ठलपंत व रखुमाई -जलसमाधी, २१ जानेवारी रोजी रेड्यामुखी वेद वदविला, २२ जानेवारी रोजी ज्ञानेश्वरी नेवासा जन्म, २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गणेश जयंतीनिमित्त काल्याचे किर्तन, सांयकाळी श्री. संत ज्ञानेश्वरी महाराज समाधी सोहळा या स्वरूपात दिनविशेष चित्रण सादर केले जाणार आहे.
शुक्रवारी, दि. २३ जानेवारी रोजी काल्याचे किर्तन संपल्यावर पालखी सोहळा, दुपारी ३ ते ४ सत्यनारायण महापुजा, सांयकाळी ५ ते ७ हळदीकुंकू समारंभ, दुपारी २ ते रात्री उशिरापर्यत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. कैवल्याचा पुतळा या सप्ताहामध्ये महेशमहाराज शिंगोटे तबलासाथ देणार आहेत. राम महाराज पांढरे, राहूल महाराज, विशाल महाराज आंळदीकर, विजय महाराज सकट हे गायकवृंद ह.भ.प गणेश महाराज (ओझर गणपती) यांना साथ देणार आहेत.