अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शिवसेना महिला आघाडी – सानपाडा विभाग, स्वरराज प्रतिष्ठान, मातोश्री वुमेन्स फाऊंडेशन आयोजित जागर महिला शक्तिचा महिला उत्सव -२०१५ समारोप सांगता कार्यक्रमात २५० महिलांचा गौरवपत्र सन्मान पत्र सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत.
सानपाडा सेक्टर ७ मधील आश्रय हॉलमध्ये सांयकाळी ५.३० ते रात्रौ ८.३० या वेळेत आयोजित कार्यक्रमात हा सोहळा होणार असून राजमाता जयंती उत्सव सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना महिला आघाडी नवी मुंबई, सानपाड्यातील सामाजिक संघटना स्वराज संघटना आणि मातोश्री वुमेन्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘जागर महिला शक्तिचा’- महिला महोत्सव २०१५ला नवी मुंबईतील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळला होता.
या अभियानांतर्ंगत पौष्ठिक पराठे, पकोडे, सॅडविच, चायनीज पदार्थ शिकविणे हे पहिल्या तीन दिवसामध्ये महिलांना शिकविण्यात आले. उर्वरित चार दिवसामध्ये आकर्षक ज्वेलरी बनविणे, वारली पेन्टिंग, मेकअप साडी नेसण्याचे १५ प्रकार शिकविण्यात आले आहेत.
सदर महोत्सवात सानपाडा विभागातील २७५ महिलांनी सहभाग घेतला आहे. १२ जानेवारीला जिजामाता जयंतीदिनी सदर प्रशिक्षण वर्गातील महिलांच्या स्पर्धा घेवून महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन शिवसेना महिला आघाडी विभाग सानपाडा विभागाच्या सौ. सावित्री चौघुले, महिला आघाडीच्या उपशहर संघठक व स्वरराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. विद्या पावगे (किर्दत), विभाग संघठक सौ. वैशाली बनकर, डॉ. आशालता गोंधळे, वैशाली भोर, रंजना कांडरकर, उपविभागसंघठक वंदना चौगुले, वंदना गोडसे, शाखासंघठक कांचनमाला वाफारे, संचिता जोईल, स्नेहल चव्हाण या रणरागिनींनी केले आहे.
तसेच संपूर्ण महोत्सवाची प्रशिक्षण जबाबदारी नवी मुंबईतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रणी असलेले स्वरराज प्रतिष्ठान पार पाडत आहे. हे प्रशिक्षण प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना महिला आघाडी व स्वरराजच्या वतीने राबविण्याचा मानस आहे.