सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या वनवैभव कला क्रिडा निकेतन या सामाजिक संस्थेकडून कोपरखैराणेत तीन दिवस पतंगमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १४ जानेवारी ते १६ जानेवारी या तीन दिवसात पतंगप्रेमींना महोत्सवामध्ये पतंग उडविण्याचा आनंद मिळणार आहे.
कोपरखैरणेतील निसर्ग उद्यानात हा तीन दिवस पतंग महोत्सव चालणार असल्याची माहिती वनवैभव कला क्रिडा निकेतनचे अध्यक्ष व भाजपाचे युवा नेते वैभव नाईक यांनी दिली. गेल्या वर्षीपासून वनवैभवच्या वतीने हा पतंग महोत्सव आयोजित केला जात आहे.
दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून वनवैभव कला क्रिडा निकेतनचे नाव नवी मुंबईतच नाही तर ठाणे जिल्ह्यात प्रसिध्द आहे. नवी मुंबईतील सर्वाधिक बक्षिसेची दहीहंडी असा वनवैभवच्या दहीहंडी उत्सवाचा अनेक वर्षे नावलौकीक आहे. गतवर्षीपासून पतंगमहोत्सवाचे आयोजन करणारी वनवैभव लवकरच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होणार असून गरीब व गरजू शालेय मुलांसाठी ग्रंथालय, अभ्यासिका, मोफत संगणक प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती वनवैभव कला क्रिडा निकेतनचे अध्यक्ष व भाजपाचे युवा नेते वैभव नाईक यांनी दिली.
नवी मुंबईतील पतंगप्रेेमींनी सलग तीन दिवस चालणार्या पतंग महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले आहे.