मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : साकव एज्युकेशनल ऍण्ड सोशल कल्चरल ट्रस्टच्या वतीने नेरूळ सेक्टर १२ मधील सारसोळे बसडेपोमागील श्री.गणेश रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महोत्सवाची प्रतिक्षा नवी मुंबईकरांना लागून राहीली आहे. मुले, युवा, महिला व ज्येष्ठ अशा सर्वांकरीताच विविध स्पर्धांचा मिलाफ असणार्या नवी मुंबई महोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण लागून राहीले आहे.
२३ जानेवारी ते २६ जानेवारी २०१५ या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महोत्सवामध्ये नृत्य, फॅशन शो, कबड्डी, गायन, रांगोळी, ज्येष्ठ नागरिक, चित्रकला, खो-खो, होम मिनिस्टर, चेस, मल्लखांब, मॅरेथान, कुकींग, बॉडी बिल्डींग, सायकलींग, दाडींया रास, डी.जे वॉर , मास्टर चेफ आदींचा समावेश आहे. नवी मुंबई महोत्सवाचे आयोजन उत्तम रावल आणि साकवच्या अध्यक्षा प्रा. वर्षा भोसले यांनी संयुक्तपणे केले आहे. प्रत्येकात काही तरी खास म्हणूनच सर्व वयोगटासाठी विविध स्पर्धांचा महोत्सव असे या नवी मुंबई महोत्सवाचे स्वरूप आहे.
नवी मुंबई महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रा. वर्षा भोसले व उत्तम रावल यांच्याकडे संपर्क साधावा असे आयोजक संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.