अनंतकुमार गवई
नवी मुंबई : कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात परिचित असणारे प्रभाग ७६ चे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सुरज पाटील यांच्या प्रभागात महापौर सागर नाईक यांच्या हस्ते मंगळवारी, दि. १३ जानेवारी रोजी विविध नागरी कामाचा शुभारंभ व कामाचे भूमीपुजन होणार आहे.
मंगळवारी सांयकाळी ७ वाजता पंडीत रामा भगत उद्यानाजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापौर सागर नाईक यांच्या हस्ते शुभारंभ होत असलेल्या नागरी कामांमध्ये भुखंड क्रं. पी-११ येथे व्यायामशाळा भूमीपुजन समारंभ, कै. पंडीत रामा भगत उद्यान नुतनीकरण कामाचा शुभारंभ (संपूर्ण उद्यान नुतनीकरण), कुकशेत गाव -भुखंड क्रं. ओ-एस-३ येथे बालोद्यान व ओ.एस ४ येथे नाना-नानी कामाचा शुभारंभ, सारसोळे डेपोशेजारील जागेत (वाचनालयाकरीता) शेड उभारणे कामाचा शुभारंभ, नेरूळ सेक्टर १२ मेथॉडिस चर्च ते पुनम टॉवरपर्यतच्या चौकाची उभारणी करणे, सेक्टर १२ पर्यतच्या गांवदेवी चौकालगतच्या पदपथाची दुरूस्ती करणे, सेक्टर १२ देवाडिगा भवन ते चर्चपर्यत पदपथ दुरूस्ती करणे, सेक्टर १२ शाळेलगतच्या गटारावर एफ.आर.पी कव्हर टाकणे, सेक्टर १२ देवाडीगा भवनलगतच्या गटारावर एफ.आर.पी कव्हर टाकणे, सेक्टर १२ शाळेसमोरील पदपथाची दुरूस्ती करणे, सहकार बाझार ते गांवदेवी चौक (शिवदर्शन सोसायटी ते तेरणा शाळेसमोरील) गटर व पदपथ नुतनीकरण कामाचा शुभारंभ, झुलेलाल मंदीर ते सारसोळे डेपो पदपथ व गटर नुतनीकरण कामाचा शुभारंभ आदी कामांचा समावेश आहे.
ना. गणेश नाईकसाहेबांच्या आशिर्वादाने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपण कामे मंजूर करवून घेण्यात यशस्वी झालो आहोत. चला विकासाचे साक्षीदार होवू या अभियानात नेरूळवासियांनी सक्रिय योगदान देण्यासाठी भूमीपुजन व उद्घाटन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सुरज पाटील यांनी केले आहे.