सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शिवसेनेच्या नेरूळमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते रविवारी, दि. २५ जानेवारी रोजी होत आहे.
नेरूळ सेक्टर सहा – सारसोळे गावातील एकविरा अपार्टंमेंटमध्ये सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, के.एन. म्हात्रे, महिला जिल्हा संघठक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, महिला आघाडी शहर संघठक रोहीणी भोईर, नगरसेवक रतन मांडवे, दिलीप घोडेकर, विभागप्रमुख गणेश घाग, शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, ज्येष्ठ शिवसैनिक बबन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नेरूळमधील शिवसैनिकांनी व स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागप्रमुख बबन जोशी व शाखाप्रमुख मनोज तांडेल यांनी केले आहे.