नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना घणसोली विभागाच्या वतीने निर्धार प्रतिष्ठानच्या माध्यमातून रविवारी, दि. २५ जानेवारी रोजी घणसोली कॉलनीत हळदीकुंकू समारंभासह होम मिनिस्टर या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ३.३० ते सांयकाळी ७ या वेळेत घणसोली कॉलनीतील नवी मुंबई सिटी हायस्कूलच्या बाजूला घरौंदा सिडकोच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास ‘फू बाई फू’फेम व ‘लय भारी’फेम मराठी अभिनेत्री मौसमी तोंडवळकर या उपस्थित राहणार आहेत.
मनसेचे शहर सचिव व निर्धार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप गलुगडे यांच्यासह घणसोलीचे मनसे विभाग अध्यक्ष सतीश केदारे, शाखाध्यक्ष अक्षय नाईक, नितीन नाईक, मनविसेचे विभाग अध्यक्ष गणपत पाटील यांच्यासह महिला आघाडी मनसेच्या पुजा मुळे, सोनल केदारे, पुष्पा सुर्वे,सुरेखा नाईक, सुवर्णा खबाळे, रोशनी केदारे, दिपाली वाव्हळे, तानुबाई गलुगडे आदी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमास मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळेंसह मनसेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास घणसोली कॉलनीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून होम मिनिस्टर खेळाचा लाभ घेण्याचे आवाहन समाजसेविका मंदा संदीप गलुगडे यांनी केले आहे.