सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर २३ मधील भुमीपुत्र मैदानावर चार दिवस डे-नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वैभव प्रतिष्ठानकडून करण्यात आले असून नवी मुंबईतील क्रिकेटप्रेमींना स्थानिक विश्वचषकाचा थरार पहायला मिळणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक वैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव नामदेव पाटील यांनी दिली.
वैभव प्रतिष्ठानकडून ‘डे-नाईट’ क्रिकेट स्व. तुकाराम नाईक चषक-२०१५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भुमीपुत्र मैदानावर २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी असा चार दिवस क्रिकेटचा थरार नवी मुंबई, पनवेल-उरण, ठाण्यातील क्रिकेटप्रेमींना पहावयास मिळणार आहे. या स्पर्धेत लाखो रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी विविध पारितोषिकांची रेलचेल असणार आहे.
वाशी गाव, खैरणे, घणसोली, दारावे, कोपरखैराणे, गोठीवली, तुर्भे गाव, जुहू गाव, तुर्भे, कुकशेत, सारसोळे, ऐरोली,वाशी गाव, तळवली, करावे या नामाकित व बहूचर्चित क्रिकेट संघासह पंचक्रोशितील विविध संघ सहभागी होत आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी भुमीपुत्र मैदानावर स्वत: भाजपा युवा नेते वैभव नाईक स्वत: मैदानावर उपस्थित राहून देखरेख करत असून आयोजकांना सूचना व मार्गदर्शन करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सलग चार दिवस अहोरात्र मैदानावर हजेरी लावतील असा आशावाद स्पर्धेचे आयोजक वैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव नामदेव पाटील यांनी स्पर्धेची माहिती देताना व्यक्त केला आहे.