नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कुकशेत गावातील नगरसेवक सुरज पाटील यांच्या प्रशासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे गावामध्ये आरोग्य केंद्राची वास्तू निर्माण होणार आहे. महापौर सागर नाईक यांच्या हस्ते 5 मार्च रोजी या इमारतीचा भूमीपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कुकशेत गाव, सेक्टर 14 येथील भुखंड क्रमांक पी 10 येथे सांयकाळी 5.30 वाजता हा भूमीपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या अगोदर 5 वाजता महापौरांच्या हस्ते श्री.गणेश रामलीला मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचाही शुभारंभ होणार आहे.