संदीप खांडगेपाटील : 8082097775
निवडणूक महासंग्राम – भाग 2
नवी मुंबई :- महापालिका निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच नेरूळ पश्चिमेला राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली आहे. पूर्वीचा महापालिका प्रभाग 70 प्रभाग पुनर्रचनेत आता 87 झाला असून या प्रभागात रतन मांडवेंचा अर्थांत मांडवे परिवारांचा करिश्मा निर्णायक ठरणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत या परिसरात कोणत्या पक्षाचा नाही तर मांडवे पॅटर्न निर्णायक ठरल्याचे जवळून पहावयास मिळालेले आहे.
प्रभाग पुर्नरचनेत या प्रभागात नेरूळ सेक्टर 10 मधील सनदर्शन, साई कॉर्नर, इंद्रप्रस्थ, नंदनवन, साईकृप्पा, सनशाईन या गृहनिर्माण सोसायट्यांचा नव्याने समावेश झाला आहे. हा प्रभाग रतन मांडवे यांचा बालेकिल्ला असल्याचे सातत्याने पहावयास मिळालेले आहे. निवडणूक समीकरणांचा विचार करता ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या जागेवर शिवसेनेकडून रतन मांडवे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल लोखंडे , भाजपाकडून दिलीप तिडके यांच्या घरातील महिला सदस्या निवडणूक लढविणार असल्याचे एव्हाना निश्चित झाले आहे.
नेरूळ सेक्टर 8 परिसरात नगरसेवक पदाच्या कालावधीत रतन मांडवे यांनी गतीमान स्वरूपात विकासकामे केली आहे. भाऊसाहेब शेरे उद्यान, छत्रपती शाहू महाराज उद्यान या दोन उद्यानाचा झालेला कायापालट नेरूळ नोडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पेव्हर ब्लॉकच्या बाबतीत ब प्रभाग समितीमध्ये रतन मांडवेंच्याच नावाची जोरदारपणे चर्चा होत आहे. महापालिका प्रशासनाकडून पेव्हर ब्लॉकप्रकरणी निर्देश स्पष्ट झाल्यावर अरूणोदय, पंचवटी, श्रमसाफल्य, प्रभात या सिडकोच्या चार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रतन मांडवे यांनी स्वत:च्या खिशातून पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मांडवेंच्या प्रभागात हायमस्टच्याबाबतीत झालेले राजकारण नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनले होते.
विरोधी पक्षाचे नगरसेवक असतानाही रतन मांडवे यांनी प्रशासनाशी गोडवा कायम ठेवत विकासकामांचा धडाका लावल्याने नेरूळ नोडमधील राजकीय वर्तुळात मांडवेंची विकासकामे असूयेचा विषय बनली आहेत. नेरूळ सेक्टर 8 मधील जनाधार हा पूर्णपणे रतन मांडवेंना अनुकुल असल्याचे सातत्याने पहावयास मिळत आहेत.
अन्य संभाव्य चर्चित उमेदवारांमध्ये भाजपाच्या सौ. वैशाली तिडके या परिचित उमेदवार आहेत. त्यांनी महापालिकेच्या तिसर्या सभागृहात या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. रतन मांडवेंच्या पत्नी सौ. सुनिता रतन मांडवे हादेखील प्रभागातील परिचित चेहरा आहे. साई जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार्या जनसेवेमध्ये सौ. सुनिता रतन मांडवेंचे योगदान आहे. साईभंडारा व अन्य कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तनिष्काच्या माध्यमातून पोलीस ठाण्यांना निवेदने, महिलांना तुळशी वाटप आदी कामांतही सौ. सुनिता मांडवेंचे योगदान आहे. महिला सुरक्षेबाबत सातत्याने नेरूळ पोलिस ठाण्याशी चर्चा करणे, वाहतुक कोंडीबाबत पत्रव्यवहार आदी कामेही सुनिता मांडवेंनी केलेली आहेत. पालिकेकडून महिला व बालकल्याण विभागाकडून असलेल्या योजनेविषयी महिलांना माहिती करून देणे, महिलांचे अर्ज स्वत: भरून घेणे आदी कामामुळे सौ. सुनिता मांडवे परिसरात घरटी परिचित चेहरा बनलेला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणूकीत नगरसेवक रतन मांडवे यांनी महापालिका निवडणूकीसारखाच प्रचार करत स्वत:ची राजकीय ताकदीची सातत्याने चाचपणी केलेली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत महापालिका निवडणूकीत मांडवेंचा जनाधार अधिक वाढण्याची भीती मांडवेंचे राजकीय विरोधक खासगीत व्यक्त केली जात आहे. नेरूळ पश्चिमेला असणार्या महापालिका प्रभागामध्ये हा प्रभाग शिवसेनेच्या हमखास प्रभागातील एक प्रभाग मानला जात आहे. या प्रभागात असणारा मांडवे दांपत्यांचा करिश्मा पाहता या जागेवर निकराची लढत देताना अन्य घटकांची दमछाक होण्याची शक्यता आहे.