नवी मुंबई : बाजार समितीचे संचालक अशोक वाळूंज यांच्या मातोश्री नानुबाई देवराम वाळूंज यांचे गुरूवार, दि. 19 मार्च रोजी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लोकनेते गणेश नाईक, आ. दिलीप वळसेपाटील, माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह 3500चा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. दशक्रिया विधी शुक्रवार, दि. 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजता वाशी सेक्टर 8 मधील जागृतेश्वर शिव मंदीरानजिक होणार आहे. आईच्या निधनामुळे अशोक वाळूंज व त्यांच्या परिवाराची न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात अशोकशेठ वाळूंज, सोपानशेठ वाळूंज, तीन सुना, नातवंडे, नातसूना, पतवंडे असा विशाल परिवार आहे.