नवी मुंबई : नेरूळ गावचे सुपुत्र व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या सामाजिक कार्यातील आक्रमकतेमुळे नेरूळ नोडमधील अन्य पक्षीय विरोधक हतबल झाले असून नेरूळ नोडमधील जनाधार पुन्हा एकवार नामदेव भगत यांच्या नेतृत्वशैलीकडे आकर्षित होवू लागल्याचे पहावयास मिळत आहे.
राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात नामदेव भगत गेली 27 वर्षे सक्रिय असून नवी मुंबईच्या बाहेर ठाणेसह पनवेल, रायगड, सोलापुर, पुणे, अहमदनगर भागात राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आगरी-कोळी भवनाची निर्मिती, आगरी-कोळी महोत्सवाचे सातत्याने यशस्वी आयोजन, रिक्षाचालकांपासून श्रमिकांपर्यत संपर्क, गोरगरीबांच्या मुलांना अत्यल्प दरामध्ये शिक्षण सुविधा आदी कार्यप्रणालीमुळे राजकीय वर्तुळात त्यांनी आपला अल्पावधीतच वेगळा ठसा उमटवला आहे. काँग्रेस पक्षामध्ये स्थानिक पातळीवर काही मतभेद निर्माण झाल्याने दोन महिन्यापूर्वी नामदेव भगत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश केल्यावर नामदेव भगत यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संघटनात्मक कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. शिवसैनिकांच्या सहवासात नव्याने कात टाकल्याप्रमाणे 18 वर्षाच्या युवकाप्रमाणे सामाजिक कार्यात नामदेव भगत सक्रिय योगदान देवू लागले आहे. आदेश बांदेकरांच्या खेळ मांडियेलाचे यशस्वी आयोजनानंतर गांवदेवी मंदीरात स्नेहसंमेलन, गोरगरीबांकरीता अत्यल्प दरात गृहनिर्माण संकुलात घरे देण्याकरता सुरू केलेल्या हालचाली, नेरूळवासियांकरता वायफाय सेवेच्या माध्यमातून घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट आदींना मोफत इंटरनेट सेवा, मोफत आरोग्य विमा, कोणतीही घटना घडली की तात्काळ क्षणाचाही विलंब न घेता घटनास्थळी धाव घेणे आदी कार्यप्रणालीमुळे नामदेव भगत यांच्या जनताभिमुख नेतृत्वाकडे नेरूळवासियांचा कल मोठ्या प्रमाणात झुकू लागला आहे.
नामदेव भगत यांच्या धडाकेबाज कामांमुळे नेरूळ नोडमधील अन्य राजकीय घटकांचे धाबे दणाणले आहे. नामदेव भगत पूर्णपणे शिवसेनामय झाले असून सोबत नव्या दमाची शिवसैनिकांची फौज त्यांना सहकार्य करताना पहावयास मिळत आहे. नेरूळ नोडमधील व सभोवतालच्या परिसरातील राजकीय घटकांच्या तुलनेत युवा वर्गामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून नामदेव भगत यांच्या नेतृत्वाकडे युवा वर्ग कमालीचा आकर्षित होवू लागला आहे.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामदेव भगत आक्रमक झाल्याने व आजूबाजूच्या प्रभागातील शिवसेना पदाधिकार्यांना, शिवसैनिकांना काय हवे-नको त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करू लागल्याने नामदेव भगतांची आक्रमकता नेरूळ नोडमधील राजकारणात महापालिका निवडणूकीत चमत्कार करण्याची भीती अन्य पक्षीयांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.