नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८७ (पूर्वीचा ७०) चे शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या नगरसेवक पदाच्या कालावधीत केलेल्या कामांचा ‘वचननामा’ कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना उपनेते विजय नाहटांच्या हस्ते वाशीतील मध्यवर्ती कार्यालयात रविवारी दुपारी करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघठक सौ. रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, बेलापुर संपर्कप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोेेरे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक रतन मांडवे, माजी आरोग्य समिती सभापती अतुल कुलकर्णी, विलास म्हात्रे, महिला विभाग संघठक सौ. सत्वशीला जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपनेते नाहटा यांनी नगरसेवक मांडवेंच्या कार्यअहवालावर नजर टाकताना मांडवेंनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी युवा सेनेचे स्थानिक शाखाधिकारी विशाल गुंजाळ, प्रकाश वाघमारे, संतोष अभंग, राजाभाऊ बोबडे, नामदेव सस्ते, प्रकाश कारभार, भिकन पाटील, सौ. शलाका पाजांरी, सौ. जयश्री बेळे, सौ. शुभांगी परब, नितीनराजे शिंदे, हेमंत पोमण, निखिल मांडवे, अजित बागल, विनय गावडे, ॠतिक शिंदे आदी स्थानिक भागातील युवा उपस्थित होते.