संजय बोरकर
नवी मुंबई :- नेरूळ गावाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रभाग ९५ मधील उमेदवार सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते ९ एप्रिल रोजी सांयकाळी ६ वाजता होत असून शिवसेना उपनेते विजय नाहटा या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सौ. इंदूमती भगत या नेरूळ गावातून सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून महापालिका सभागृहात गेल्या आहेत. नेरूळ गावात पाटील परिवारात जन्मलेल्या सौ. इंदूमती भगत या नेरूळ गावातीलच भगत परिवारातील सूनबाई आहेत. शिवसेनेच्या हमखास विजयी जागांमधील नेरूळ गावातील सौ. इंदूमती भगत यांची जागा एक गृहीत धरण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर २० मधील पूनम टॉवरमधील दुकान क्रं. ५ मध्ये सौै. इंदूमती भगत यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ होत असून त्याअगोदर सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या प्रभाग ९३ मधील नेरूळ सेक्टर २० येथील षटकार अपार्टमेंटमधील बिल्डींग क्रं. १ ते १२ येथील प्रचार कार्यालयास खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा भेट देणार असून प्रचार यंत्रणा राबविण्याविषयीचे मार्गदर्शन उपस्थित शिवसैनिकांना करणार आहेत. नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसर मिळून समाविष्ठ झालेल्या दोन महापालिका प्रभागामध्ये तब्बल १५ वर्षानंतर नामदेव भगत व सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याने नेरूळ गावातील शिवसैनिकांचा उत्साह दुणावला आहे. प्रभाग ९३ व ९५ या जागांवर शिवसेनेकडून निवडणूक लढविणार्या भगत दांपत्याला निवडणूक रिंगणात तुल्यबळ विरोधी उमेदवार नसल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.