संजय बोरकर
नवी मुंबई : महानगरपालिका निवडणूका प्रचाराचा वेग आता गतीमान झाला असून नेरूळ पश्चिमेला प्रभाग 87 मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच आहे. घरटी प्रचारादरम्यान सौ. सुनिता मांडवे यांनी आघाडी घेतली असून प्रचार अभियानात शिवसेनेने तीन गट बनविले आहेत.
रतन मांडवे यांनी महापालिकेच्या चौथ्या सभागृहात केलेली कामे आणि परिसराचा केलेला कायापालट ही सौ. सुनिता मांडवेंच्या प्रचारात जमेची बाजू ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी मांडवेंनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयास चालविला असला तरी त्यातून विरोधकांचेच जनसामान्यांत हसे होवू लागले आहे. मांडवेसमर्थकांनी प्रचार अभियानात सन 2010चा प्रभाग आणि आताचा 2015चा प्रभाग हाच मुद्दा प्रभावीपणे जनसामान्यांत मांडण्यास सुरूवात केली आहे.
शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे यांनी घरटी प्रचारावरच जोर दिला असून शिवसेनेच्या तीन गटांनीदेखील एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारावर धडाका दिल्याने प्रभाग 87 प्रचार अभियानादरम्यान शिवसेनामय झालेला पहावयास मिळत आहे. प्रभाग 87 मध्ये नेरूळ सेक्टर आठचा पूर्ण परिसर येत असून सेक्टर दहाच्या पाच गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश आहे.
प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे या महिलांसोबत, नगरसेवक रतन नामदेव मांडवे हे पुरूषासमवेत आणि युवा सेनेचे शाखाध्यक्ष विशाल गुंजाळ व हेमंत पोमण यांच्यासमवेत युवा आघाडी परिसर पिंजून काढत आहेत. शुक्रवार सांयकाळपर्यत घरटी प्रचार करताना शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवेंनी 17 कंपाऊड, रतन मांडवेंनी 2 कंपाऊंड, विशाल गुंजाळ व हेमंत पोमण यांनी 8 कंपाऊड पिंजून काढले आहेत.
रतन मांडवेंनी प्रभागात केलेली कामे, प्रभागात रतन मांडवेंचा असलेला घरटी जनसंपर्क यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून प्रचाराची त्यांनी पातळी सोडलेली पहावयास मिळत आहे. प्रचारादरम्यान त्यांनी विकासाचा मुद्दा न मांडता व्यक्तिगत प्रचारावर भर दिला आहे. सौ. सुनिता मांडवे यांनी गतपाच वर्षात सामाजिक व पालिका स्तरावर केलेल्या कामाबाबत विरोधक पत्रकातून विचारण करू लागताच परिसरातील शिवसैनिकांनी व मांडवेसमर्थकांनी त्यास चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केल्याने विरोधकांच्या या प्रचारातील हवाच निघून गेली आहे. रहीवाशांमध्ये विरोधकांचे हसे होवू लागले आहे. 2010 साली महापालिका निवडणूकीत पराभूत झाल्यावर ज्यांनी या विभागातून काढता पाय घेतला, विभागाशी संपर्क ठेवला नाही आणि आता महापालिका निवडणूकीत त्यांना परत सेक्टर आठ परिसराची आठवण झाली आहे. गतपाच वर्षात या प्रभागात काय झाले, त्याची इतरांनी आठवण काढू नये अथवा विचारणा करू नये असे प्रत्युत्तर शिवसैनिकांनी देण्यास सुरूवात केली आहे.
रतन मांडवे नगरसेवक असले तरी महिला बालकल्याण विभागाच्या योजना, योजना विभागाचे प्रकल्प, शिष्यवृत्तीचे अर्ज याबाबतीत सौ. सुनिता मांडवे स्वत: पुढाकार घेवून स्वत: अर्ज भरून घेत असत. विरोधकांना पाहिजे असेल तर त्यांनी पालिका प्रशासनातील संबंधित अधिकार्यांकडे विचारणा करून खातरजमा करावी. सौ. सुनिता रतन मांडवेंनी सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटवला आहे. जागतिक महिला दिनी केलेले विविध कार्यक्रमदेखील विरोधकांना माहिती नसावेत. कारण पराभूत झाल्यावर त्यांनी प्रभागाशी संपर्क ठेवला नसल्याने त्यांना या कार्यक्रमाची माहिती नसावी. मोफत तुळशी वाटप, आरोग्य शिबिराचे आयोजन, महिला सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील निरीक्षकांशी भेटी, वाहतुक कोंडीबाबत केलेला पाठपुरावा यासह अन्य कामातही सौ. सुनिता मांडवेंचा पुढाकार विभागातील रहीवाशांनी जवळून पाहिला आहे. ज्यांचा प्रभागाशी पराभूत झाल्यावर संपर्क राहीला नाही, त्यांनी पालिका निवडणूकीत येवून प्रभागाविषयी कळवळा दाखवू नये असे प्रत्युत्तर शिवसैनिकांकडून देण्यात येवू लागले आहे.
घरटी प्रचारावर दिलेला भर सौ. सुनिता मांडवेसाठी आणि शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरली आहे. विरोधकांना प्रचाराकरता मुद्देच न राहील्याने त्यांनी सुरू केलेला व्यक्तिगत प्रचार आता त्यांच्याच अंगलट येवू लागला आहे.