नवी मुंबई : महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला नेरूळ परिसरात खर्या अर्थांने रंग चढला असून नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसराचा समावेश असणार्या प्रभाग ९३ व प्रभाग ९५ मध्ये शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेनेचे प्रभाग ९३ चे उमेदवार नामदेव रामा भगत आणि प्रभाग ९५चे उमेदवार सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी घरटी प्रचारावर भर दिला असून त्यांना मिळणार्या जनसामान्यातील उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे पहावयास मिळत आहे.
नेरूळ गावातून सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून महापालिकेत गेलेल्या सौ. इंदूमती भगत यांनी शुक्रवारी अरूणोदय, शिवदर्शन, मनोरमा, गेहलोत या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरटी प्रचार केला आहे. शनिवारी सकाळी नेरूळ गावामध्ये त्यांनी घरटी प्रचार केला. प्रभाग ९३ मध्ये शिवसेना उमेदवार व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनीदेखील घरटी परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी बालाजी मंदीर परिसरातील ए ब्लॉकमध्ये त्यांनी घरटी जनसंपर्क करून नागरिकांशी सुसंवाद साधत आपली भूमिका मांडली आहे.