संजय बोरकर
नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग क्रं. 42 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देविदास हांडेपाटील यांनी घरटी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी सेक्टर 16 मधील माथाडी वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत माथाडी कामगार परिवारांकडून हांडेपाटील उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
प्रभाग 42 मध्ये कोपरखैराणेतील सेक्टर 22,23 आणि सेक्टर 16 मधील माथाडी कामगारांच्या 461 सदनिकांचा समावेश होत आहे. या परिसरात 1994 पासून हांडेपाटील यांचा व्यक्तिगत जनसंपर्क दांडगा असल्याने तसेच सन 2005-2010 या काळात नगरसेवक म्हणून हांडेपाटील यांनी या परिसराचे महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.
रविवारी माथाडी वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार अभियानात महिला वर्गाकडून ओवाळून, साखर वाटून हांडेपाटील यांचे स्वागत करण्यात आले. 1994 पासून जनसेवा करता हांडेपाटील यांनी जमा केलेला जनाधार प्रचाराअभियानादरम्यान स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. रविवारी झालेल्या प्रचार सभेत ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे ओबामा म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जाणार्या संदीप नाईकांनी देविदास हांडेपाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली असून लवकरच हांडेपाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सूतोवाच केले. हांडेपाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये युवा वर्गापासून वयोवृध्दांचा समावेश पहावयास मिळत आहे.