ंसंजय बोरकर
नवी मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माथाडी नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, लोकनेते गणेश नाईक, डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक यांनी नवी मुंबईतील माथाडी कामगार वर्गासाठी सतत भरीव योगदान दिले असल्याने कोपरखैराणे सेक्टर १६ मधील माथाडी कामगार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मतदान करतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग ४२ चे उमेदवार देविदास हांडेपाटील यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हमखास विजयी होणार्या जागांमध्ये प्रभाग ४२चाही समावेश असल्याने हांडेपाटील यांच्या विक्रमी मताधिक्क्याकडे कोपरखैराणेवासियांचे लक्ष लागून राहीले आहे. १९९४ सालापासून देविदास हांडेपाटील कोपरखैराणे परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. सन २००५ ते २०१० या काळात महापालिकेच्या तिसर्या सभागृहात हांडेपाटील यांनी भरीव कामगिरी केली होती. डपिंग ग्राऊंडच्या जागेवर क्रिडांगण व निसर्ग उद्यान ही हांडेपाटील यांच्याच परिश्रमाची पोचपावती आहे. नगरसेवक बनण्यापूर्वी लोकनेते गणेश नाईकांच्या मुशीत घडलेल्या या कार्यकर्त्यांने डपिंग ग्राऊंड स्थंलातरणाबाबत केलेले जनआंदोलन, सिडकोच्या निकृष्ठ ईमारतीबाबत सिडकोविरोधात केलेला पाठपुरावा यामुळे हांडेपाटील स्थानिक परिसरात नावारूपाला आलेले आहेत.
प्रभाग ४२ मध्ये समाविष्ठ होणार्या कोपरखैराणे सेक्टर २२,२३ आणि १६ मधील परिसरात हांडेपाटील यांचा १९९४ पासून असलेला घरटी जनसंपर्क ही राष्ट्रवादी कॉंगे्रससाठी जमेची बाजू आहे. सेक्टर १६ मधील माथाडी कामगार हा सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाठराखण करणारा घटक आहे. शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनीदेखील हांडेपाटील यांच्या विजयासाठी माथाडी कामगारांना सूचना केल्या आहेत.
कोपरखैराणे परिसरात माथाडी कामगारांना सुरूवातीच्या काळात अवघ्या २० हजार रूपयांमध्ये ओटे मिळाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील हे हयातभर माथाडी वर्गासाठीच कार्यरत आहेत. महापालिका प्रशासनाच्या व सिडकोच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने माथाडींच्या समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयास केला आहे. त्यामुळे हांडेपाटील हा आमच्या घरातील सदस्य असल्याने इतरांना मतदान करण्याचा प्रश्नच नाही अशा प्रतिक्रिया माथाडी कामगारांच्या घराघरातून उघडपणे व्यक्त केल्या जात आहेत.