नवी मुंबई : ज्या सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातून गतपाच वर्षात आठ हजाराच्या आसपास लेखी तक्रारी महापालिका , सिडको, पोलीस मुख्यालय, मंत्रालय व जनता दरबारात जातात, त्या सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना आता विकासकामांची प्रतिक्षा असल्याचे प्रचार अभियानादरम्यान उघडपणे पहावयास मिळाले. एकीकडे सारसोळे गावाचा बकालपणा ,नेरूळ सेक्टर सहाच्या न सुटलेल्या नागरी समस्या आणि दुसरीकडे कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर दहाच्या काही परिसराचा अवघ्या पाच वर्षात सुरज पाटील यांनी केलेला कायापालट ही तफावत प्रचार अभियानादरम्यान सारसोळे ग्रामस्थांच्या आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांच्याही लक्षात आल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना विकासकामांची प्रतिक्षा असल्याने प्रभाग ८५ व प्रभाग ८६ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला विकासकामे या एकमेव मुद्यावर मतदारांची पसंती सर्वाधिक पडण्याची शक्यता आहे.
सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा आणि कुकशेत गाव मिळून प्रभाग ८५ आणि प्रभाग ८६ बनलेला आहे. प्रभाग ८५ हा महिला ओबीसीसाठी आरक्षित तर प्रभाग ८६ हा महिला अनुसूचितसाठी आरक्षित झालेला प्रभाग आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा हा परिसर नागरी समस्या सोडविण्याकरता महापालिका, पोलीस मुख्यालय, सिडको, मंत्रालय आणि जनता दरबार येथे दाखल झालेल्या लेखी तक्रारींमुळे नवी मुंबईकरांच्या चर्चेचा विषय ठरला. दुसरीकडे सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराला लागून असलेल्या कुकशेत गावात सुविधांचा डोंगर उभा राहीला. ही तफावत लक्षात आल्याने सारसोळेच्या युवा ग्रामस्थ आणि नेरूळ सेक्टर सहाचे युवा वर्ग हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरज पाटील यांच्या नेतृत्वाकडे आकर्षिला गेला आहे.
सारसोळे गावातील अर्धवट मल:निस्सारण वाहिन्या, गावातील रस्त्यांची दुर्रावस्था, गटारांची दुर्रावस्था, गावात वाढणार्या चोर्या, महिला पोलिसावरच झालेला हल्ला, पथदीपांची दुर्रावस्था, आजही बामणदेवाकडे जाणारा कच्चा मार्ग, पदपथ हे चित्र आणि कुकशेत गावामध्ये होत असलेली विकासकामे आता सारसोळे ग्रामस्थांच्याही निदर्शनास आली आहेत. कुकशेत गावात एकीकडे सुरज पाटील यांच्या अथक प्रयासाने सुरू झालेली इंग्रजी माध्यमाची शाळा तर दुसरीकडे सारसोळे शाळेतील बंद पडलेले पंखे, शाळेच्या तीन वर्गात असलेले सिमेंटचे ठोकळे हे चित्र सारसोळे ग्रामस्थांच्या आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांच्या निदर्शनास आले आहे. सारसोळेच्या जेटीबाबत व बामणदेव मार्गाबाबत महापालिका सभागृहात कधीही फारशी चर्चा झाली नाही. कुकशेत गावातील मुलांकरीता सुसज्ज केलेले महापालिकेचे क्रिडांगण आणि नेरूळ सेक्टर सहाचे क्रिडांगण बालक-पालक दोघांच्याही लक्षात आले आहे. नेरूळ सेक्टर सहाच्या क्रिडांगणाला तर गतपाच वर्षात नामफलकही लागलेला नाही.
मार्च महिन्यात होणार्या दहावी-बारावीच्या परिक्षा नजरेसमोर ठेवून मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होवू नये यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोज मेहेर यांनी या कालावधीत भाजी मार्केटच्या मैदानात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास गेली ४ वर्षे पोलीस दरबारी पाठपुरावा करत विरोध केला आहे.नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाच्या सुरक्षिततेबाबत राष्ट्रवादी कॉँगे्रेसचे मनोज मेहेर यांनी पाच वर्षात नेरूळ पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पालकमंत्र्यांचा जनता दरबार, गृहमंत्री, मुख्यमंत्री या सर्वांकडे पाठपुरावा केला आहे. सुरज पाटील यांनी निवडून आल्यावर नेरूळ सेक्टर दहामधील गृहनिर्माण सोसायट्यांची सुरक्षितता लक्षात घेवून सीसीटीव्ही कॅमेरेे बसविले. पण सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्याबाबत हालचाली झाल्याच नाहीत. शिवम, नेरूळ सी-व्ह्यू सोसायटीत झालेल्या चोर्या व घरफोड्यांचा उलगडा अजून झालाच नाही.
नेरूळ सेक्टर सहामधील शिवम सोसायटीसमोरील प्रवेशद्वारासमोरील कचर्यांची दुर्गंधी, रस्त्यावर बाराही महिने विखुरलेला कचरा, गावातील अर्ंतगत रस्त्यावर विखुरलेला कचरा, सारसोळे गावातील महापालिका शाळेच्या मागेच रस्त्यावर विखुरलेला कचरा यात गत पाच वर्षात काहीही सुधारणा झालेली नाही. सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहामधील बेरोजगारी हटविण्यासाठी बेलापुर मतदारसंघात पहिले ‘रिक्रूटमेंट सेंटर’ सारसोळेत सुरू करण्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आल्याने सारसोळेच्या व नेरूळ सेक्टर सहामधील युवा वर्गात उत्साहाचे वातावरण संचारले आहे.
प्रभाग ८५ व प्रभाग ८६ या जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारडे जड असून केवळ विकास याच एकमेव मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रचारात भर दिला जात आहे. सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामधील निवारण न झालेल्या नागरी समस्या आणि दुसरीकडे शेजारीच असलेला कुकशेत गाव ही तफावत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणार आहेत.
प्रभाग ८५ मध्ये कुकशेत गावात सुरज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सौ. सुजाता सुरज पाटील, नेरूळ सेक्टर सहामधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे, शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले माजी शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, पत्रकार व परिसरातील नागरी समस्या निवारणासाठी प्रशासनदरबारी पाठपुरावा करणारे संदीप खांडगेपाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते परिश्रम करत आहेत. प्रभाग ८६ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजयासाठी भालचंद्र मढवी, मनोज मेहेर, यशवंत तांडेल, दिपक म्हात्रे, सौ. ज्योती म्हात्रे, अशोक आतकरी, महादेव पवार, ज्ञानेश्वर विश्वासराव, स्वप्निल म्हात्रे, सचिन डावरेंसह सारसोळेचे युवा ग्रामस्थ आदी मंडळी जीवाचे रान करत आहेत. नेरूळ पश्चिमेला प्रभाग ८५ व ८६ या जागा विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस बाजी मारणार असल्याचे चित्र प्रचार अभियानादरम्यान पहावयास मिळत आहे.
घरटी प्रचारामध्येदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने भर दिला असून सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दोनदा, सुरज पाटील यांनी एकदा तर त्यांचे समर्थक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, हितचिंतक सातत्याने जनसंपर्क करत आहे. विकासाकरता प्रभाग ८५ व ८६ राष्ट्रवादी कॉंग्रेसला या दोन प्रभागातून मोठ्या मताधिक्यांने विजय मिळण्याचा आशावाद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीतून व्यक्त केला जात आहे.