संजय बोरकर
नवी मुंबई : कोपरखैराणे परिसरातील दिग्गजांच्या लढतीमध्ये प्रभाग ४२मधील भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील लढत लक्षवेधी व बहूचर्चित बनली होती. तथापि लोकनेते गणेश नाईक यांचे कडवट समर्थक म्हणून ओळखले जाणार्या देविदास हांडेपाटील यांनी ६५०पेक्षा मतांनी विजय मिळविला.
देविदास हांडेपाटील यांच्या प्रभागात कोपरखैराणे सेक्टर २२,२३ आणि १६ या परिसराचा समावेश आहे. हांडेपाटील या परिसरात १९९४ पासून कार्यरत असून ते त्यांच्या जनसेवेमुळे तेथील घराघरात परिचित आहेत. एक कार्यकर्ता म्हणून डपिंग ग्राऊंडच्या स्थंलातरणासाठी केलेले आंदोलन, सिडकोच्या निकृष्ठ बांधकामाविरोधातील लढा, चेनस्नॅचिंगच्या वाढत्या घटनांकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी केलेले ‘रास्ता रोको’ आंदोलन यामुळे हांडेपाटील परिचित व्यक्तिमत्व बनले होते.
महापालिकेच्या तिसर्या सभागृहात देविदास हांडेपाटील हे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत निसर्ग उद्यान, भूमीपुत्र क्रिडांगण, युवकांना रोजगार यासह असंख्य भरीव कामे हांडेपाटील यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून केली होती. परंतू पुढे महिला ओबीसी राखीव झाल्याने हांडेपाटील यांची पालिकेतून ‘एक्झिट’ झाली. तथापि हांडेपाटील यांच्या जनसेवेत व जनसंपर्कात खंड पडला नाही. महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग आरक्षणेत प्रभाग ४२ पुरूषांसाठी खुला झाला. हांडेपाटील यांचा जनसंपर्क व जनसेवा पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले. निवडणूकीत विरोधी पक्षाच्या घटकांऐवजी स्थानिक भागातीलच काही घटकांनी हांडेपाटील यांच्या विरोधात काम करत अपक्षांना ताकद पुरविण्याचे काम केले. विरोधकांकडेही विकासकामांबाबत हांडेपाटील यांच्या विरोधात काही नसल्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून हांडेपाटील यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयास केला. मतदारांनी विरोधकांच्या या प्रयासाल मतपेटीतून चोख उत्तर देत हांडेपाटील यांना विजयी केले. निकालानंतर निघलेल्या विजयी रॅलीत हांडेपाटील यांचे ठिकठिकाणी झालेली जंगी स्वागत पाहिल्यावर हा प्रभाग हांडेपाटील यांच्याच मागे भक्कम उभा असल्याचे दिसून आले.