संजय बोरकर
नवी मुंबई : महापालिका प्रभाग क्रं. 87 मध्ये शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे यांनी गेल्या काही दिवसापासून सातत्याने घरटी जनसंपर्कावरच भर दिल्याने मतदार आणि उमेदवार यांच्या भेटी-गाठीचा सुसंवाद पहावयास मिळत आहे. शिवसेनेच्या हक्काच्या विजयी जागामध्ये या जागेचाही समावेश असल्याने शिवसैनिकांसाठी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
रविवारी सांयकाळी शिवसेना उमेदवार सौ. सुनिता रतन मांडवे यांनी सेक्टर 8 मधील माथाडी कामगारांची वसाहत असणार्या कै. अण्णासाहेब पाटील रहीवाशी संघटना हा परिसर पिंजून काढला. यावेळी सुनिता मांडवेसमवेत युवा वर्ग व महिला मोठ्या संख्येने होता. यावेळी शिवसेनेच्या घोषणांनी एलआयजीचा परिसर दणाणून गेला. एलआयजी परिसर हा पूर्णपणे माथाडी कामगारांचा परिसर. सौ. सुनिता रतन मांडवे या एका माथाडी कामगाराची सून असल्याने माथाडी वसाहतीचा कल सौ. सुनिता मांडवेंच्या बाजूने झुकू लागला आहे. त्यातच शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांचा एलआयजी परिसरात असणारा घरटी जनसंपर्क व एलआयजीत त्यांनी केलेली नागरी विकासाची कामे या गोष्टी मतदानादरम्यान सुनिता मांडवेंच्या पथ्यावर पडणार्या आहेत.