संजय बोरकर
नवी मुंबई : महापालिका निवडणूकांचा प्रचार आता नवी मुंबई कार्यक्षेत्रात जोर धरू लागला असून कोपरखैराणे परिसरात मात्र प्रभाग ४२ मध्ये मतदारच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार देविदास हांडेपाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करताना पहावयास मिळत आहे. प्रचारादरम्यान हांडेपाटील यांच्या कार्याची पोचपावती व जनाधार स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. घरटी प्रचारादरम्यान गृहीणी हांडेपाटील यांचे औक्षण करताना तर कोणी साखर देताना पहावयास मिळत आहे. हांडेपाटील आमच्या घरातीलच एक सदस्य असल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये सेक्टर २२,२३ आणि सेक्टर १६ मधील काही परिसराचा समावेश होत आहे. हांडेपाटील स्वत: सेक्टर २३ मधील आकाशगंगा या सिडको सोसायटीतील रहीवाशी असून महापालिकेच्या तिसर्या सभागृहात नगरसेवक म्हणून या प्रभागाचे त्यांनी काम केले आहे. सेक्टर २२,२३ आणि सेक्टर १६ परिसरात त्यांचा घरटी जनसंपर्क आहे. गत तीन दिवसात हांडेपाटील यांनी सेक्टर २२ आणि २३ परिसर पिंजून काढला आहे. सेक्टर १६ व १७ मधील रस्त्यालगतच्या सोसायट्या त्यांनी पिंजून काढल्या आहेत.
घरटी प्रचारादरम्यान महिला वर्गाकडून व रहीवाशांकडून हांडेपाटील यांचे उत्स्फुर्त स्वागत केले जात आहे. महिला वर्गाकडून त्यांचे औक्षण केले जात आहे. साखर वाटून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. हांडेपाटील यांचे २२ वर्षापासून या परिसरात कार्य असून घरटी जनसंपर्कामुळे या परिसरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे.