संजय बोरकर
नवी मुंबई : निवडणूकांमध्ये लाट कोणाचीही असो, पण कोपरखैराणे सेक्टर २२,२३ व अन्य सभोवतालच्या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेस निर्धास्त असते. देविदास हांडेपाटलांसारखा बिनीचा मोहरा या विभागात कार्यरत असल्याने आघाडी निश्चित असते. देविदास हांडेपाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोपरखैराणे परिसरातील प्रभाग ४२ मधून निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ज्या हमखास विजयाच्या जागा गृहीत धरल्या आहेत, त्यामध्ये या प्रभागाचाही प्राधान्याने समावेश आहे. परिसरात घरटी जनसंपर्क असलेल्या देविदास हांडेपाटील यांनी घरटी प्रचारात घेतलेली आघाडी आणि जनसामान्यांकडून मिळणारा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यावर या प्रभागात देविदास हांडेपाटील या एकमेव नावाचीच चर्चा पहावयास मिळत आहे.
कोपरखैरणे गेल्या अडीच दशकापासून देविदास हांडेपाटील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकनेते गणेश नाईकांचा एक प्रामाणिक कडवट अनुयायी म्हणून देविदास हांडेपाटील यांना नवी मुंबईत ओळखले जात आहे. कोपरखैराणे परिसरात जनसामान्यांची कामे करणारे हांडेपाटील आर्थिकदृष्ट्या कमजोर असले तरी जनधाराच्या बाबतीत गर्भश्रीमंत असल्याने त्यांना या विभागातून अडविणे अन्य पक्षीय विरोधकांना गेल्या काही वर्षात शक्य झालेले नाही.
कोपरखैराणे येथे असणारे डंपिंग ग्राऊंड तुर्भेतील नियोजित जागी स्थंलातरीत करावे आणि कोपरखैराणेवासियांची जीवघेण्या दुर्गंधीतून मुक्तता करावी याकरीता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधातील आंदोलन आजही कोपरखैरोवासियांच्या लक्षात आहे. कोपरखैराणे सेक्टर २३ येथील आकाशगंगा या सिडकोच्या निकृष्ठ दर्जाच्या इमारत बांधकामाबाबत हांडेपाटील यांनी सिडकोशी दिलेला लढा व प्रशासनदरबारी केलेला पाठपुरावा यामुळे हांडेपाटील नवी मुंबईकरांच्या निदर्शनास आले.
२००५ ते२०१० या महापालिकेच्या तिसर्या सभागृहात या विभागाचे हांडेपाटील प्रतिनिधीत्व केलेले आहे. नगरसेवक म्हणून सभागृहात वावरताना डपिंग ग्राऊंडच्या ठिकाणी झालेले भव्य क्रिडांगण, निसर्ग उद्यानाची निर्मिती ही हांडेपाटील यांच्या परिश्रमाची पोचपावती आहे. नगरसेवक नसतानाही परिसरातील जनतेशी हांडेपाटील यांनी सातत्याने जनसंपर्क ठेवत लोकांची कामे केली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसला या परिसरातून मिळालेली आघाडी हांडेपाटील यांच्या जनाधाराची पोचपावती आहे या परिसरात समाविष्ठ असलेल्या माथाडी वसाहतीमध्येही हांडेपाटील घरटी परिचित असल्याचे परिसरात पहावयास मिळत आहे.