नवी मुंबई : एन.आर.भगत कॉलेज नेरूळ येथील प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्थेत सन 2007 पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान या विभागांचे अभ्यासक्रम सुरू आहेत. या परिसरात वास्तव्य करणार्या विद्यार्थी व पालकांच्या विनंतीवजा आग्रहावरून एन.आर.भगत या शैक्षणिक संस्थेने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एम.एस्सी – मॅथ्स, एम.ए – मराठी, इंग्रजी या विषयासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने एम.एस्सी- मॅथ्स या अभ्यासक्रमास परवानगी मागील आठवड्यात देण्यात आली आहे. लवकरच एम.ए शाखेतील मराठी व इंग्रजी या विषयांस परवानगीपत्र लवकरच प्राप्त होईल असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव रामा भगत यांनी व्यक्त केला आहे.